“नाट्य परिषद करंडक” राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धेत पुणे विभागातील स्पर्धा उत्साहात..या एकांकिका झाल्या सादर..

पुणे : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती मुंबई आयोजित “नाट्य परिषद करंडक” राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धा पुणे विभागासाठी दि. २३ व २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र कल्चरल सेंटर येथे उत्साहात पार पडल्या. पुणे शाखा अध्यक्ष मेघराजराजे भोसले, कोथरूड शाखेचे उपाध्यक्ष समीर हंपी, मुख्य कार्यवाह सत्यजित धांडेकर, शाखेचे कोषध्यक्ष दीपक गुप्ते यांच्या उपस्थितीत नटराज पूजन करून स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.
पहिल्या दिवशी अमुक तमुक थिएटर (अवंचित), अन्विता थिएटर (ब्रँडेड बाय सडक छाप), दृकश्राव्य मीडिया (एक अधिक उणे), रंगनाट्य (उद्घाटन), दादा साहेब फाळके फिल्म इन्स्टिटयूट( ए आई टू ए. आय), कलाकंड प्रॉड. (दि निगोसीएशन), लेट दिनकरराव बेहरे आर्ट फाउंडेशन (मैं हूँ ना), नाट्य कुल ( एक एप्रिल), नाट्य हर्ष ( शमा), कलाकार मंडळी ( नाटेक)या एकांकिका सादर झाल्या.

दुसऱ्या दिवशी पराग थिएटर (टाईम टर्नर), दृष्टी पुणे( लगबत), रंग पंढरी ( बरड), रस नवमी ( अगीनफुल), सिंहगड लॉ कॉलेज ( चूक), शब्दमाग वेळ ( सहजीवन), टीम रामरक्षा ( रामरक्षा), उदगार ( कुछ तो लोग कहेंगे) अश्या दोन दिवसांमध्ये एकूण १८ संघांनी आपल्या एकांकिका सादर केल्या.
ह्या वेळी समन्वयक देवेन्द्र भिडे, नाट्य परिषद कोथरूड शाखेच्या अश्विनी थोरात, अनुराधा हटकर, दीपक पवार, अक्षय जगताप, गिरीश गोडबोले, अजिंक्य दाते, अभिषेक महाजन यांनी स्पर्धा यशस्वी करण्यात मोलाचा हातभार लावला.
परीक्षक म्हणून विश्वास सोहनी,गिरीश पत्की यांनी काम पाहिले.
ही स्पर्धा राज्यातल्या १)रत्नागिरी (रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग करिता) २) कोल्हापूर ३) सांगली ४) सातारा ५) सोलापूर
६) पुणे ७) नाशिक ८) जळगाव, ९)धुळे, नंदुरबार १०) अहमदनगर ११) बीड, छत्रपती संभाजीनगर
१२) नांदेड १३) लातूर, धाराशिव १४) अकोला, वाशिम, यवतमाळ १५) अमरावती १६) नागपूर १७) चंद्रपूर, वर्धा १८)ठाणे १९) नवी मुंबई २०) मुंबई या संभाव्य केंद्रांवर होणार असून अंतिम फेरी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे, यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, मनमाला टँक रोड, माटुंगा-माहीम, मुंबई येथे दिनांक १५, १६, १७ आणि १८ सप्टेंबर २०२५ ह्या कालावधीत संपन्न होणार असल्याचे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेचे मुख्य कार्यवाह सत्यजित धांडेकर यांनी सांगितले.






