पुणे शहर

बावधनमधील वनाहा सोसायटीमधील नागरिकांचा बिल्डरने फसवणूक केल्याचा आरोप..

नागरिकांनी माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्यासमोर मांडली व्यथा..त्यानंतर पोलिसांकडे फसवणुकीची तक्रार

बावधन : शापूरजी पालोनजी निर्मित वनाहा सोसायटी मधील नागरिकांची बिल्डरकडून फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार पुढे आला आहे. या सोसायटीमधील नागरिकांनी स्थानिक माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्याकडे आपली व्यथा मांडल्यानंतर त्यांनी याची दखल घेत बिल्डर विरोधात नागरिकांना घेऊन बावधन पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.

किरण दगडे पाटील म्हणाले येथील रहिवाशांनी मांडलेल्या तक्रारी धक्कादायक आहेत. यामध्ये भिंतींमध्ये गळती, रंग निघणे, निकृष्ट दर्जाचे बांधकाम, पर्यावरणाला धोका निर्माण करत डोंगर फोडून केलेले बेकायदेशीर बांधकाम, सोसायटीला जाणारा रस्ता अपूर्ण, दगड कोसळण्याचा जीवघेणा धोका, ॲमिनिटी स्पेसमध्ये नैसर्गिक अडथळा, दिव्यांग नागरिकांसाठी सुविधा नाहीत, खराब गुणवत्तेचे पिण्याचे पाणी,  बिल्डरने १ वर्षाचा मेंटेनन्स फक्त ८ महिन्यात संपवला, क्लब हाउस, जॉगिंग ट्रॅक, स्विमिंग पूल बंदच  या गंभीर बाबींवर आम्ही बावधन पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. 

Fb img 1757841132875698734583622208205

या संदर्भात जर बिल्डरवर कठोर कारवाई झाली नाही आणि नागरिकांना न्याय मिळाला नाही, तर आम्ही मोठं जनआंदोलन उभारू आणि त्यासाठी रस्त्यावर उतरू. हे आंदोलन प्रत्येक नागरिकाच्या हक्कासाठी असेल. या फसवणुकी संदर्भात रेरा तसेच एनजीटी मध्ये देखील तक्रार दाखल केली जाईल असे किरण दगडे पाटील यांनी म्हंटले आहे.

Img 20250508 wa00014407724251968801054

१. सोसाइटी टाउनशिप मेंटेनेंस चे पैसे आधीच जमा करुण घेऊन टाउनशिप तयार नाही आणि पैसे पण सोसायटीला परत देण्यात आले नाहीत, व्याज पण देणार नाही असे सांगितल्या गेले कारण तीन वेगळ्या सोसाइटीचा पैसा एकाच बिल्डर च्या करंट अकाउंट मधे जमा करण्यात आला.
२. बांधकाम पूर्ण झाले नसतानाही बिल्डर ने लोकांकडून डिले पेमेंटचे व्याज वसूल केले. ह्यापोटी बिल्डर ने सर्व सभासदांकडून  कोटीमधे व्याजापोटी रक्कम जमा केली.  बऱ्याच स्विमिंग पूल, स्क्वाश कोर्ट ईटीसी ही कामे आज पण अपूर्ण आहेत.
३. पाणी पुरवठ्याची जबाबदारी संबंधित बिल्डर ने घेतलेली होती परंतु सुरुवातीपासूनच टँकर्स लावण्यात आले होते आणि सोसायटी सभासदांना ईमेल करून पैशांची मागणी करण्यात आलेली आहे. पाणी पुरवठा हा दूषित आणि गढूळ असा होत असून त्यामुळे रहिवाशांचा आरोग्यावर परिणाम होत आहे. तरीही बिल्डर हा बेजबाबदार पणे वागत आहेत व मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. अशा तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत.

Img 20250913 wa02065865367835442147326

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये