महाराष्ट्र

उर्मिला मातोंडकरने काँग्रेसची ऑफर नाकारली

मुंबई : विधानपरिषदेच्या १२ सदस्यांची नियुक्ती लवकरच होणार आहे. मंत्रिमंडळाच्या शिफारशीने राज्यपालांकडे नावे पाठवली जातील आणि त्यांच्या मंजुरीनंतर ही निवड प्रक्रिया पूर्ण होईल. साहित्य, कला, क्रीडा या क्षेत्रात कार्यरत व्यक्तींच्या नावाची निवड याद्वारे केली जाते. शिवसेने यासाठी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर त्यांचे नाव निश्चित केले आहे. २०१९ साली लोकसभेची निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढवलेल्या मातोंडकर यावेळी शिवसेनेच्या उमेदवार असतील.

Img 20201028 wa0145

विधानपरिषदेच्या उमेदवारीसाठी काँग्रेस पक्षाने उर्मिला मातोंडकर यांना विचारणा केली होती. मात्र त्यांनी राज्यसभेसाठी इच्छुक असल्याचे सांगत काँग्रेसची ऑफर नाकारली, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठमंत्री विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी एका मुलाखतीत बोलताना केला. कंगना राणावत यांच्या विरोधात मातोंडकर यांनी भूमिका घेतल्याने त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी देणे स्वाभाविकच आहे , असे मतही वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.

Img 20201024 wa0166 1

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये