पुणे शहर

वारजे नवरात्र सांस्कृतिक महोत्सवातील सहभागी कलाकारांचा सन्मान

वारजे : नवरात्र सांस्कृतिक महोत्सव वारजे, पुणेच्या वतीने  फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून दिनांक १७  ते २४ ऑक्टोबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या कलाकारांचा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आयोजक महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ व शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

फेस बुक लाईव्ह च्या माध्यमातून आठ दिवस चाललेल्या या नवरात्र सांस्कृतिक महोत्सवात हास्य मैफिल या कार्यक्रमात बंडा जोशी यांनी विनोद आणि विडंबनाचे धम्माल सादरीकरण करून रसिकांचे मनोरंजन केले. त्यांनी प्रवासात घडणारे विनोद सांगत कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना खळखळून हसवले. काव्यसुगंध ग्रुपच्या रंग जीवनाचे या काव्य गायनाच्या कार्यक्रमात कवी चंद्रशेखर धर्माधिकारी, विनायक देशपांडे, कवयित्री साधना कुलकर्णी यांनी सादर केलेल्या काव्य रचनांना श्रोत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. चांदणनक्षी या कार्यक्रमात ज्योत्स्ना चांदगुडे यांनी स्वरचित कविता आणि गझला सादर केल्या.

Img 20201024 wa0166 1

शिवचरित्र व्याख्याना द्वारे ह. भ. प. धर्मराज महाराज हांडे यांनी वीर बाजीप्रभू देशपांडे यांनी केलेल्या पराक्रमाचा इतिहास सर्वांसमोर मांडला. अभिनेत्री मेघना संजय झुझम( भिंबर पाटील)यांनी मी तुमची सावित्रीबाई फुले हे एकपात्री नाटक सादर केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह वि.दा. पिंगळे यांनी साहित्य कला आणि मानवी जीवन या विषयावर व्याख्यान देत साहित्याचे मानवी जीवनातील महत्त्व विशद केले. अमोल मोरे यांनी भक्तिरंग या कार्यक्रमातून भक्ती गीते सादर केली. तर डॉ. अनघा राजवाडे यांनी जागर स्त्री शक्तीचा या कार्यक्रमातून स्त्री शक्तीची महती सर्वांसमोर मांडली.

Img 20201028 wa0145

या महोत्सवाच्या कार्यक्रमात सहभागी असलेल्या कवयित्री साधना कुलकर्णी, अमोल मोरे, ह.भ.प. धर्मराज महाराज हांडे, मेघना झुझम, विनायक देशपांडे व वि. दा. पिंगळे या सर्वांचा कोजागिरी निमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात  सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी  महेश कुलकर्णी यांनी केले. दीपाली धुमाळ यांनी आभार व्यक्त केले. शेवटी मसाला दूधपानाचा आस्वाद घेऊन सांगता झाली.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये