पुणे शहर

नागरिकांचा हा सकारात्मक प्रतिसाद आणि विश्वास आमच्यासाठी प्रेरणादायी- अमोल बालवडकर 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा प्रभाग क्रमांक 9 बाणेर बालेवाडी पाषाण, सुतारवाडी  सूस, म्हाळुंगे परिसरात सोसायटीमध्ये बैठकांचा धडाका….

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज रेवीरिया परिसरात भेट देत स्थानिक नागरिकांशी विश्वासपूर्ण संवाद साधला. यावेळी परिसरातील नागरी सुविधा, वाहतूक, पाणीपुरवठा, स्वच्छता तसेच भविष्यात आवश्यक असलेल्या विकासकामांबाबत चर्चा केली.

या भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार अमोल बालवडकर, गायत्री मेढे-कोकाटे, बाबुराव चांदेरे, पार्वती निम्हण या चौघांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी समाधान व्यक्त केले. 

रेवीरिया परिसरातील नागरिकांनी यावेळी सांगितले की, केवळ आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष कामावर भर देणारे नेतृत्वच प्रभागाला पुढे नेऊ शकते. त्यामुळे येत्या निवडणुकीत विकास, पारदर्शकता आणि लोकाभिमुख प्रशासनासाठी नागरिकांनी अमोल बालवडकर आणि पॅनल मधील गायत्री मेढे-कोकाटे, बाबुराव चांदेरे, पार्वती निम्हण यांना भक्कम पाठिंबा देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

Img 20251125 wa01782121520512185783132

अमोल बालवडकर म्हणाले, नागरिकांचा हा सकारात्मक प्रतिसाद आणि विश्वास आमच्यासाठी प्रेरणादायी असून, रेवीरिया परिसरासह संपूर्ण प्रभागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आम्ही सर्व उमेदवार अधिक जोमाने आणि जबाबदारीने काम करत राहू, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.विकासाभिमुख दृष्टिकोन, वेळोवेळी केलेली कामे आणि प्रत्येकाशी संवाद साधण्याची भूमिका यामुळे आमच्यावर नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे यावेळी जाणवले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये