नागरिकांच्या मनातील विकास साधणे हेच आमचे ध्येय- हर्षवर्धन दीपक मानकर

राष्ट्रवादीच्या पदयात्रा, कोपरासभांना प्रभाग ११ मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे : पुणे महानगरपालिका प्रभाग क्र. ११ रामबाग कॉलनी, शिवतीर्थनगर अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हर्षवर्धन दीपक मानकर, तृप्ती निलेश शिंदे व कांता नवनाथ खिलारे यांनी पदयात्रा व कोपरा सभा याव्दारे प्रभागातील नागरिकांशी संवाद साधला. शिव प्रतिष्ठान मित्र मंडळ, त्रिमूर्ती मित्र मंडळ, राजीव गांधी पार्क एआरएआय रोड येथे कोपरा सभा झाल्या. सुतारदरा क्रांतिसेना मित्र मंडळ, दत्तनगर आदी भागात पदयात्रा काढण्यात आल्या.
उत्स्फूर्तपणे महिला उमेदवारांना ओवाळत होत्या. ज्येष्ठांनी आशिर्वाद देत, जुन्या आठवणी सांगत केलेले मार्गदर्शन यामुळे आम्ही भारावून गेलो असे सांगत हर्षवर्धन मानकर म्हणाले की, त्यांच्या मनातील विकास साधणे हे आमचे प्रमुख ध्येय राहील.“प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे, पारदर्शक कारभार करणे आणि सर्वांगीण विकास साधणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. नागरिकांच्या विश्वासावर आणि सहकार्यावर प्रभागाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील.”

प्रभागातील समस्या, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक सुविधा तसेच महिला व ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित विविध समस्या नागरिकांनी सांगितल्या. सर्व उमेदवारांनी नागरिकांचे प्रश्न लक्षपूर्वक ऐकून घेतले व त्या सोडवण्यासाठी प्राधान्याने पाठपुरावा करण्याचे मानकर यांनी आश्वासन दिले.



