पुण्याच्या नव्या महापौरांची निवड 6 फेब्रुवारी ला होणार…

पुणे : पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकी नंतर पहिली सभा म्हणजेच महापौर,उपमहापौर यांची निवडणूक घेणे याबाबत तारिख, वेळ आणि सभेच्या अध्यक्षस्थानी पिठासीन अधिकारी यांच्या निश्चिती करिता विभागीय आयुक्त यांचेकडे पत्र पाठविण्यात आले होते. विभागीय आयुक्त यांचेशी झालेल्या चर्चेनुसार महापौर, उपमहापौर यांची निवडणूक घेणे याकरिता शुक्रवार, दि. ६ फेब्रुवारी २०२६ ही तारिख निश्चित करण्यात आलेली असून, ही पहिली विशेष सभा शुक्रवार, दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी, सकाळी ११.०० (अकरा) वाजता घेण्यात येईल. याबाबतचा कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येईल. अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली आहे.
पुणे महापालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली असुन भारतीय जनता पक्षाने या निवडणूकीत मोठे यश संपादन करीत पुन्हा एकदा सत्ता मिळविली आहे. या निवडणूकीनंतर पुण्याच्या महापौर पदी कोण विराजमान होणार याची चर्चा सुरू आहे. पुणे महापालिकेचे महापौर पद यंदा खुल्या गटातील महीले साठी राखीव असल्याने भारतीय जनता पक्षाच्या इच्छुक नगरसेविकांनी आणि त्यांच्या पती राजांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या भेटी गाठी घेत मोर्चे बांधणी सुरू केली आहे.
पुणे महापालिका प्रशासनाने महापौर पदाची निवडणुकीची तारीख जाहीर केल्यामुळे आता 6 फेब्रुवारी रोजी अखेर हि उत्सुकता संपणार आहे. या निवडणूकीसाठी महापालिका प्रशासनाकडून लवकरच कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे.




