सर्वसामान्य माणसाला संविधानाने जगण्याचा मार्ग दिला : सुनंदा जोशी

पुणे : “भारतीय संविधानाने सर्वसामान्य माणसाला जगण्याचा मार्ग दिलेला आहे. त्या माध्यमातूनच समाजातील प्रत्येक घटकाला समान अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळवून दिला. आज स्वातंत्र्यानंतर देशात वेगळी परिस्थिती पहावयास मिळत आहे. घटनाकारांसह देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्यवीर हुतात्म्यांना कधीही विसरता कामा नये. त्यांच्या स्मृती आणि कार्य समजून घेण्याचा दिवस म्हणजे आजचा प्रजासत्ताक दिन असल्याचे मत ज्येष्ठ शिक्षिका व लेखिका सुनंदा जोशी यांनी व्यक्त केले.

फुलेनगर येथील हुतात्मा स्मारक उद्यान येथे आयोजित ७७ व्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे शहर कार्याध्यक्ष निखिल गायकवाड, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संपतराव पोळ (वय ९०), जनार्दन तोंडे, मोहन ननावरे, अनिरुद्ध हळंदे, भारत हिरवे, मजहर खान, वैजयंती जगताप, जयश्री शिरोळे,विठ्ठल कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.



निवृत्त सहायक पोलीस आयुक्त मिलिंद गायकवाड म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकशाही संविधान अंमलात आणण्यात आले. परंतु आज प्रत्यक्षात संविधानाला अपेक्षित सर्व समावेशक काम होताना दिसून येत नाही. भारतीय राज्यघटनेला अपेक्षित असे लोकशाही पूरक कार्य होण्यासाठी सर्वांनी गांभीर्याने वागले पाहिजे.



याप्रसंगी मंदाकिनी डिखळे, वर्षा नाईक, अंजनी साईल, वंदना सोनवणे यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले. रॉयल संगीत सरगम यांनी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता डायस अँथनी, रफिक बागवान, संजय भोसले, मनीषा गायकवाड, विद्या गडकरी, पोपट कांबळे, बाबुराव गावंडे, ननुलाल नहारिया, उल्हास गडांकुश, किशोर हेंद्रे, सुदाम कदम, वसंत मुंगसे यांच्यासह स्मायली ग्रुपच्या सदस्या तसेच महात्मा फुले ज्येष्ठ नागरिक संघ, चैतन्य हास्ययोग क्लब आणि कार्यक्रमाचे संयोजक हुतात्मा स्मारक गार्डन मित्रपरिवार यांचे बहुमोल सहकार्य लाभले.



