पुणे शहर

बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनच्या वतीने “नागरिक आणि नगरसेवक जनसंवाद”

पुणे : बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनच्या वतीने “नागरिक आणि नगरसेवक जनसंवाद” या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी स्थानिक नगरसेवकांनी उपस्थित राहून नागरिकांशी थेट संवाद साधला.

बाणेर-बालेवाडी परिसरातील सुमारे सव्वाशे नागरिक शनिवारी एलाईट एम्पायर सोसायटी येथे मोठ्या उत्साहात एकत्र आले होते. या संवादातून नागरिकांनी आपल्या दैनंदिन अडचणी आणि स्थानिक प्रश्न मोकळेपणाने मांडले.

Img 20260222 wa00065926623401269940689

यामध्ये अपूर्ण रस्ते, तुटलेले फुटपाथ, सुरक्षा व्यवस्था, ड्रेनेज समस्या, साई चौकातील कचरा प्रश्न, भाजी मंडई परिसरातील अडचणी, राधा चौक, एस्केपी कॅम्प व रविंद्रनाथ शाळेजवळील वाहतूक कोंडी, ममता चौकात सिग्नलची आवश्यकता, जुपिटर चौकातील वाहतूक नियमन, फूटपाथवरील आठवडी बाजार, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, बालेवाडीतील दारू दुकानामुळे निर्माण होणारा त्रास तसेच एमएनजीएलच्या नवीन कनेक्शनसंदर्भातील प्रश्न यांचा समावेश होता.

यावेळी नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेवक बाबूराव चांदेरे, नगरसेविका तथा औंध प्रभाग समिती अध्यक्षा रोहिणी चिमटे, नगरसेविका व स्थायी समिती सदस्या मयुरी कोकाटे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

नागरिकांच्या सहकार्याने आणि सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून बाणेर-बालेवाडी परिसराचा सर्वांगीण विकास घडवून आणू, असा विश्वास यावेळी स्थानिक नगरसेवकांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये