एकनाथ खडसें विरोधात ब्राम्हण महासंघ आक्रमक; उद्या राष्ट्रवादीच्या प्रत्येक शहर कार्यालयात देणार निषेधपत्र

पुणे : राष्ट्रवादी चा गुण नाही पण वाण लागला.पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादीला याची भरपाई करावी लागेल.
एका बामणाला मी मुख्यमंत्री पदाचे दान दिले असं जाहीर वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले आहे. ब्राह्मण महासंघ याचा तीव्र निषेध करतो आहोत. अशी प्रतिक्रिया ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांनी व्यक्त केली आहे.
दवे म्हणाले, दान देण्यासाठी मुळात ती वस्तू आपल्या अधिकारात असायला हवी याचे ज्ञान खडसे यांना नसावे याचे आश्चर्य वाटतं आहे.खडसे यांनी आपले विधान त्वरित मागे घेऊन माफी मागावी अन्यथा पुण्यात आल्या नंतर त्यांना याचा जाब विचारण्यात येईल.या मागणीचे आणि निषेध चे पत्र घेऊन उद्या सकाळी 11 वाजता आम्ही राष्ट्रवादी चे पुणे शहर अध्यक्ष चेतन तुपे यांच्या कार्यालयात जात आहोत.

खडसे यांचा निषेध करून आमची भूमिका त्यांच्या पर्यंत पोहोचवण्याची सुचना आम्ही तुपे यांना करणार आहोत.उद्या महाराष्ट्र भर सर्वच शहरातील राष्ट्रवादी च्या कार्यालयात आम्ही अशी पत्रे देत आहोत.खडसे यांनी वक्तव्य मागे घेतले नाही तर राष्ट्रवादी ला पदवीधर निवडणुकीत त्याचे परिणाम भोगावे लागतील. याची जाणीव त्यांनी ठेवावी. असा इशाराही दवे यांनी दिला आहे.






