शैक्षणिक

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे : महाराष्ट्र शासनामार्फत सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागातंर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह (गुणवंत), पुणे (PUNE) हे कार्यरत आहे. या वसतिगृहात इयत्ता ११ वी १२ वी सर्व शाखांमध्ये शिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय अनु. जाती, अनु. जमाती, वि.जा.भ.ज., आर्थिक मागास प्रवर्ग, अपंग, व अनाथ मुलींना शासनाने निर्धारित केलेल्या टक्केवारी अधीन राहून रिक्त जागांवर प्रवेश दिला जाणार आहे.

Fb img 17803875442192531368419001118856

या मुलींच्या वसतिगृहात किमान ८५ विद्यार्थिनींची सोय होणार आहे. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थिनींना शासनामार्फत निवास, भोजन, स्टेशनरी साहित्य, आंथरुन – पांघरून व दरमहा खर्चासाठी प्रत्येकी १५०० रूपये प्रमाणे निर्वाह भत्ता व स्वच्छता प्रसाधनासाठी प्रत्येकी १५० रुपये देण्यात येतात. वसतिगृहात स्वतंत्र संगणक कक्ष (कॉम्प्युटर लॅब Computer Lab), अद्यावत ग्रंथालय (Library) यांची सुविधा आहे.
सन २०२६-२७ या वर्षात सामाजिक न्याय विभागामार्फत वसतिगृह प्रवेशासाठी सर्व अभ्यासक्रमाचे
ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. तरी त्यानुसार विद्याथ्यांनी ऑनलाइन फॉम Website – https://hmasnew.mahait.org वर अर्ज करण्यात यावे. अधिक माहितीसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकिय वसतिगृह, येरवडा, पुणे येथील गृहपाल श्रीमती एस. एन. शेलार यांच्याकडे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. या वसतिगृह योजनेचा जास्तीत जास्त विद्यार्थिनींनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र शासनाकडून करण्यात येत आहे.

Img 20260222 wa00063650015197115571458

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये