बार्टी संस्थेमार्फत आर्थिक सहाय्य योजना

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे,मार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोग अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2025 उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखत परीक्षा तयारी करिता एकरक्कमी आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. या परीक्षेस पात्र असलेल्या महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखत परीक्षेच्या तयारीसाठी प्रती विद्यार्थी रक्कम रु. 5,000/- एकरक्कमी आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2025 उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखत परीक्षेच्या तयारीसाठी आर्थिक सहाय्य देणेबाबत घोषित केले आहे. सदर निकालानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोग अराजपत्रित गट-ब परीक्षा 2025 उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखत परीक्षा तयारी करिता पात्र असलेल्या उमेदवारांना एकरक्कमी रक्कम रु. 5,000/- चे आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे. त्याबाबत सविस्तर जाहिरात व ऑनलाईन फॉर्म बार्टी संस्थेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन बार्टी संस्थे मार्फत करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी http://barti.maharashtra.gov.in > NOTICEBOARD > Maharashtra Public Service Commission Group-B interview 2025 येथे भेट द्यावी.



