पुणे शहर

पुण्यात निवेदन देण्यापूर्वीच काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

काँग्रेसकडून तीव्र शब्दात निषेध!!!

पुणे : शहराचे नवीन कारभारी खासदार तथा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे वडगावशेरी मतदार संघात येणार होते. नुकत्याच जंतर-मंतर दिल्ली येथे झालेल्या आंदोलनातील विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत या मागणीचे निवेदन वडगाव शेरी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने खासदार मोहोळ यांना देण्यात येणार होते. मात्र निवेदन देण्यापूर्वीच येरवडा पोलिसांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. सुरक्षेच्या कारणास्तव सकाळी 11 ते दुपारी तीन या वेळेत या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात ठेवलेले होते. देशात राज्यात आणि पुणे शहरात पूर्ण सत्तेत असलेल्या भाजप सरकारकडून अशा प्रकारे पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून कार्यकर्त्यांना डांबून ठेवण्यात आलेल्या कृतीचा काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करण्यात आला आहे.

Img 20260222 wa00063491038201882637992
Img 20260726 wa00385713174076039787357
पुणे पोलिसांसमोर आपले म्हणणं मांडताना कॉंग्रेस कार्यकर्ते

नीट पेपर फुटी प्रकरणी संपूर्ण देशात भाजपा आणि मोदी सरकार यांच्या विरोधात सध्या मोठ्या प्रमाणावर विरोधाची लाट पसरलेली आहे. देशभर विद्यार्थी आणि नागरिक आंदोलन करून निषेध व्यक्त करत आहेत. दिल्ली येथील आंदोलनात सरकारच्या सूचनेवरून पोलिसांकडून विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण करण्यात आली. अखेर शनिवारी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात आल्यावर देशभरात सुरू असलेली आंदोलने काही प्रमाणात थांबवण्यात आली आहेत. दरम्यान आज रविवारी (दि.26 जुलै) रोजी खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावतीने चंदननगर येथे ” खासदार जनसंपर्क अभियान” आयोजित करण्यात आलेले होते. यावेळी खासदार मोहोळ यांना निवेदन देऊन आंदोलन विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी लोकशाही मार्गाने स्थानिक काँग्रेस पदाधिकारी करणार होते. मात्र सुरक्षेचे कारण सांगत काँग्रेस पदाधिकाऱ्यांना थेट पोलिसांनी ताब्यात घेऊन नजर कैदेत ठेवले. आपल्या लोकशाही संविधानावर चालणाऱ्या देशातील नागरिक किंवा पक्ष संघटना यांना शांततेच्या मार्गाने निवेदन देऊन लोकप्रतिनिधी यांना भेटण्याची मुभा आहे. मात्र भाजप सरकार हुकूमशाही पद्धतीने सत्तेचा गैरवापर करून नागरिकांवर दबाव तंत्र वापरण्याचे काम सातत्याने करीत असल्याचा आरोप यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला. कार्यक्रम संपेपर्यंत काँग्रेस पदाधिकाऱ्यांना येरवडा पोलीस स्टेशन या ठिकाणी डांबून ठेवण्यात आलेले होते. यावेळी नगरसेवक विशाल मलके, माजी नगरसेवक राजेंद्र शिरसाठ, येरवडा ब्लॉक अध्यक्ष रमेश सकट, वडगाव शेरी ब्लॉक अध्यक्ष राजू ठोंबरे, काँग्रेसचे युवा नेते सागर खांदवे, डॉ. पवन सोनवणे, अनुसूचित विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रियंकाताई रणपिसे, वडगाव शेरी युवक अध्यक्ष प्रसाद वाघमारे, सोशल मीडिया समन्वयक अमित कांबळे, प्रशांत केदारी, विजय साबळे, डॉ.रमाकांत साठे,जॉन्सन हिरे, गणेश कांबळे,अक्षय राजगुरू, शानू चलवादी, रुनेश कांबळे, ताराताई शर्मा यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Img 20260726 wa0037281298306261994481845493
कॉंग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पुणे पोलीस

कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गीते यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पदाधिकाऱ्यांना ताब्यात ठेवण्यात आलेले होते. देशात राज्यात आणि पुणे शहरात पूर्ण सत्तेत असलेल्या भाजप सरकारकडून अशा प्रकारे पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून कार्यकर्त्यांना डांबून ठेवण्यात आलेल्या कृतीचा काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये