पुणे शहर, जिल्हा

किल्ले रायरेश्वर परिसरातील आदिवासी-कातकरी वस्त्यांमध्ये दिवाळीचा आनंद ; पुण्यातील गणेश मंडळांचा उपक्रम

पुणे: किल्ले रायरेश्वर परिसरातील आदिवासी-कातकरी वस्त्यांमध्ये दिवाळीचा आनंद; फराळ, आकाशकंदील व सायकलींचे वाटपपुणे : दिवाळीचा आनंद समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने भोर तालुक्यातील अतिदुर्गम अशा किल्ले रायरेश्वर परिसरातील टिटेघर, नाझरे व माकोशी येथील आदिवासी-कातकरी वस्त्यांमध्ये पुणे शहरातील गणेशोत्सव मंडळांच्या वतीने दिवाळी साजरी करण्यात आली.

Img 20261110 wa0235

या उपक्रमांतर्गत ५१ आदिवासी कुटुंबांना दिवाळी फराळ व आकाशकंदील भेट देण्यात आले. तसेच शैक्षणिक मदतीचा भाग म्हणून लहान विद्यार्थ्यांसाठी पाच सायकलींचे वाटप करण्यात आले. दिवाळी फराळ व सायकलींची भेट मिळाल्याने वस्तीवरील लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता.

Img 20261110 wa0285



हा सामाजिक उपक्रम जय गणेश व्यासपीठ, पुणे शहर यांच्या अंतर्गत नवज्योत मित्र मंडळ, येरवडा; वीर शिवराज मंडळ, गुरुवार पेठ; संजीवनी मित्र मंडळ, सहकारनगर आणि साईनाथ मंडळ ट्रस्ट, बुधवार पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

Fb img 17943028178201893105560870135925


दुर्गम भागातील कातकरी विद्यार्थ्यांपर्यंत सायकली पोहोचविण्यासाठी सागर गांधी व पीयूष शहा यांनी विशेष योगदान दिले. कार्यक्रमाचे आयोजन अमित जाधव, किरण सोनीवाल, प्रसाद दिवटे, निलेश कोंढांपूरे, चैतन्य सिन्नरकर व अक्षय पानसरे यांनी केले होते.

Img 20261110 wa0224
Fb img 1794291516457
Fb img 1794293187252


दिवाळीचा सण केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता समाजातील गरजू घटकांसोबत आनंद वाटून साजरा करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. नाझरे वस्ती वरील महिला अध्यक्षा मंगला वाघमारे यांनी  पुण्यातील गणेशोत्सव कार्यकर्त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत आभार मानले आज तुमच्या मुळे आमची दिवाळी खऱ्या अर्थाने साजरी होणार आहे.

Img 20261110 wa0126
Img 20261108 wa01192784216726696966762
Img 20261110 wa0233
Img 20261110 wa0237
Img 20261110 wa0238
Fb img 1794291613984
Addaheading 20261012 112603 0001
Img 20261108 wa00032551437689311826009
Addaheading 20261107 085150 0000
Img 20251020 wa0016282297746091081089016679
Img 20261107 wa00041351533853315325461
Img 20261031 wa0190
Img 20251022 wa0324
Fb img 1794303450213 1
Img 20251017 wa0416
Img 20261106 wa0242
Addaheading 20261106 220105 0000

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये