पुणे शहर
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डासाठी ५ कोटी रुपये मंजूर- आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : राज्य शासनाकडून खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या विकासाकरिता ५ कोटीचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पत्रकाद्वारे कळविली आहे.
राज्यातील कँन्टोन्मेंट बोर्डांना विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे धोरण दि. २२ ऑक्टोबर २o१८ रोजी निश्चित केले होते. याबाबत हिवाळी अधिवेशनात ( सन २०१९ ) औचित्याचा मुद्दा मी उपस्थित केला होता. त्या अनुषंगाने नगरविकास. सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी कॅंन्टोन्मेन्ट बोर्डाच्या विकासासाठी वैशिष्टयपूर्ण योजनेअंतर्गत ५ कोटी मंजूर केले असून विभागीय आयुक्तांनी शासनास प्रस्ताव दिल्याचे लेखी कळविले असे आमदार शिरोळे यांनी पत्रकात म्हटले आहे.










