पुणे शहर

अभय योजनेचा कालावधी ३१ डिसेंबर पर्यंत वाढवावा :  धुमाळ

पुणे :  पुणे महापालिकेकडून मिळकत कराची ५० लारखापर्यंत थकबाकी असलेल्या मिळकतकर धारकांसाठी २ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत अभय योजना  राबविण्याचा येत आहे. या योजनेअंतर्गत थकबाकीदारांनी मिळकतकर भरल्यास त्यांना मोठी सवलत देण्यात आल्याने योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोरोनामुळे लॉक डाऊन काळात अनेकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे त्यामुळे मिळकत भरण्यासाठी अभय  योजनेची मुदत ३१ डिसेंबर पर्यंत वाढविण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केली आहे.

या संदर्भातील पत्र धुमाळ यांनी स्थायी समिती अध्यक्षांकडे  दिले आहे. अभय योजनेत ३० नोव्हेंबर पर्यंत थकबाकीदारांनी मिळकतकर भरल्यास, त्यांना मूळ मिळकत कराच्या रक्कमेवर दरमहा व्याज म्हणून लावलेल्या शास्ती कराच्या रक्कमेत ८० टक्के सवलत मिळणार आहे.

Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 00 pm

मिळकतीवर आकारण्यात येणाऱ्या तीन पट शास्ती व दंडामुळे मोठ्या प्रमाणात मिळकतकराची रक्कम गेली काही वर्षे थकली आहे. यामुळे महापालिकेच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे. त्यातच मागीलवर्षी पावसामुळे झालेले नुकसान, यावर्षी कोरोना आपत्तीमुळे, मिळकत कराकडून थकबाकी वसुल करताना दरमहा आकारण्यात आलेला २ टक्के दंडाच्या रक्कमेत ८० टक्के सूट देण्यात आली आहे. यासाठी २ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत मिळकतकर अभय योजना राबवली आहे. या योजनेस चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु यावर्षी कोरोनाचा वाढता संसर्ग, लॉकडाऊनची पार्श्वभूमी पाहता अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत. तसेच नोकरी गमावण्याचे प्रमाण देखील वाढलेले आहे. अनेक नागरिकांना उत्पन्न ठप्प झाल्याने अभय योजनेचा लाभ घेता आला नाही.

तरी पुणे महापालिकेच्या मिळकत कराची अभय योजनेचा कालावधी एक महिना बाढवून ३१ डिसेंबर २०२० पर्यंत करण्यात यावा अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे. 

Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 13 pm
Img 20201118 wa0057

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये