राजकीय

तुम्ही सुरुवात केली.शेवट आम्ही करू संजय राऊतांचा भाजपला इशारा

मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने छापा टाकल्यामुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. ‘केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करून सरकारवर दबाव आणता येईल असं वाटत असेल तर तो मुर्खपणा आहे. तुम्ही सुरुवात केली आम्हाला शेवट कसा करायचा हे चांगले माहिती आहे’ अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली.

‘केंदीय तपास यंत्रणांचा वापर करून हे सरकार दबावाखाली येईल असं कुणाला वाटत असेल तर ते मूर्खांच्या नंदनवनात वावरत आहेत. CBI, ED काही असू द्या, आम्ही सर्व कुणालाही शरण जाणार नाहीत. लढत राहू हे सरकार पुढे 25 वर्षे कायम राहील. एजन्सीचा वापर करून जे सरकारवर दबाव आणू पाहत आहेत. त्यांनी लक्षात घ्यावे हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. तुम्ही कितीही नोटीसी पाठवा, कितीही धाडे दाखल करा, खोटे पुरावे द्या, पण विजय हा सत्याचाच होत असतो’ असं राऊत यांनी भाजपला ठणकावून सांगितले.

Img 20201114 wa0195

‘तपास संस्थांचा वापर करून सरकारवर दबाव आणू इच्छित आहे. आमदारांचा विश्वास तोडू पाहत आहे. पण, त्यांनी हे लक्षात आणावे हा शिवरायांचा आमदार आहे. आता ही काळ्या दगडावरची रेष आहे. तुमचे सरकार येणार नाही. तुम्ही सुरुवात केली आम्हाला शेवट कसा करायचा हे चांगले माहिती आहे. ईडीने आमच्या आमदारांच्या खासदारांसमोर ईडीने कार्यालय थाटले तरी काही फरक पडणार नाही’ असंही राऊत म्हणाले.

Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 13 pm
Img 20201118 wa0057

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये