पुणे शहर

पुणे महापालिका हद्दीत २३ गावे समाविष्ट करण्याला राज्य सरकारची मंजुरी

पुणे: पुणे महापालिका हद्दीत 23 गावे समाविष्ट करण्यासाठी देण्यात आलेल्या प्रस्तावाला नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे 23 गावं पुणे महापालिकेत समाविष्ट होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यासंदर्भात अध्यादेश काढण्याची प्रक्रिया काही दिवसांत पूर्ण होणार आहे. त्यानंतर ही गावे महापालिकेत समाविष्ट होतील, अशी माहिती आमदार चेतन तुपे यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून ही गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय झाला आहे.

हि आहेत 23 गावे

Img 20201213 wa0074

खडकवासला
किरकटवाडी
कोंढवे धावडे
मांजरी बुद्रूक
नांदेड
न्यू कोपरे
नऱ्हे
पिसोळी
शेवाळवाडी
काळेवाडी
वडाची वाडी
बावधन बुद्रूक
वाघोली
मांगडेवाडी
भिलारेवाडी
गुजर
निंबाळकरवाडी
जांभूळवाडी
होळकरवाडी
औताडे हांडेवाडी
मंतरवाडी
नांदोशी
सूस
म्हाळुंगे

त्यानंतर युती सरकारच्या काळात 11 गावे महापालिकेत समाविष्ट करण्यातही आली. उर्वरित गावंही टप्प्याटप्प्यानं महापालिकेत घेण्यात येतील असं शपथपत्रही देण्यात आलं होतं. त्यानंतर ही गावं महापालिकेत घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला. आता या निर्णयानंतर प्रस्ताव मंजूर करुन पुढील महिल्यात निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट होणाऱ्या गावांच्या विकासासाठी पहिल्या टप्प्यातच 10 हजार कोटी रुपयांचा निधी लागेल, असं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.

Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 13 pm

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये