कोथरुड

कर्वेनगरमध्ये रस्त्याकडेची खोदाई बुजवण्याचे काम निकृष्ट ; वाहने अडकून नागरिकांना त्रास

संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी

कर्वेनगर : रस्त्याच्या कडेने केलेली खोदाई चुकीच्या पद्धतीने बुजवल्याने त्यात  वाहनांची चाके अडकून बसण्याचे प्रकार घडत आहेत. या  प्रकारांमुळे कर्वेनगर, कोथरुड परिसरातील वाहन चालक त्रस्त झाले असून महापालिका प्रशासन या चुकीच्या कामांकडे कधी लक्ष देणार असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे.

सहवास सोसायटी मध्ये रस्त्याच्या कडेने खोदकाम करण्यात आले आहे. हे खोदकाम महावितरणकडून करण्यात आल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगितले जात आहे. काम झाल्यानंतर केलेले खोदकाम बुजवताना पुरेशी खबरदारी घेतली गेली नसल्याचे दिसत आहे. केवळ माती ओढून खोदकाम बुजवण्याचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे त्यावरून वाहने जाताना चाके रुतून बसत आहेत. गाडीचे चाक रुतून बसल्यानंतर गाडी खड्ड्यातून काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत असल्याचे चित्र पाहिला मिळत आहे.

करण्यात आलेली खोदकाम बुजवण्यात आल्यानंतर त्यावरून कॉंक्रिटीकरण केले जाणे आवश्यक आहे, मात्र ठेकेदाराने केवळ जुजबी काम करून तेथून काढता पाय घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर महापालिका प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मंदार बलकवडे यांनी केली आहे.

खोदकाम करून काम झाल्यानंतर ते कशा पद्धतीने बुजवण्यात आले आहे याची तपासणी महापालिका प्रशासनाने करणे आवश्यक आहे. मात्र पालिका अधिकारी या कडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप बलकवडे यांनी केला आहे.

Img 20201213 wa0074

अशा प्रकारांमुळे सर्वसामान्य नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने पालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणार का? असे चुकीचे काम करणाऱ्यांवर पालिका कठोर कारवाई कधी करणार हे आता पहावे लागणार आहे. प्रशासन लक्ष देत नसल्यानेच ठेकेदार अशी चुकीची कामे बिनधास्तपणे करत असल्याचे बोलले जात आहे.

1609323038998 udyam bank big advt 30 dec 2020

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये