पुणे शहर

एरंडवण्यात महापालिकेची पेहेलवान जिम

नगरसेवक दिपक पोटे यांच्या प्रयत्नातून अभिनव उपक्रम

पुणे : ‘राष्ट्रीय युवा दिनाचे’ औचित्य साधून नगरसेवक दिपक पोटे यांच्या प्रयत्नातून तसेच पुणे महापालिका व युवा स्वराज्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अश्या अत्याधुनिक ‘पेहेलवान जिमचे’ उद्घाटन भाजप प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, संघटक सरचिटणीस राजेश पांडे, वनराईचे अध्यक्ष राजेंद्र धारिया, कोथरुड मतदार संघाचे अध्यक्ष पुनीत जोशी,  नगरसेवक जयंत भावे,मंजुश्री खर्डेकर, राजाभाऊ बराटे, सुशील मेंगडे, मानसी देशपांडे, भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर,प्रशांत हरसुले,मिताली सावळेकर, विठ्ठल बराटे, हर्षदा फरांदे,दिपक पवार,रमेश चव्हाण, प्रभागाचे अध्यक्ष राजेंद्र येडे, बाळासाहेब धनवे, निलेश गरूडकर,प्राची बगाटे, पेहेलवान जीमचे संचालक सागर धारिया तसेच इतर मान्यवर नागरीक व प्रभागातील पदाधिकारी उपस्थित होते़.

1609323038998 udyam bank big advt 30 dec 2020

नगरसेवक दिपक पोटे म्हणाले, नगरसेवक झाल्यानंतर प्रभागातील  नागरिकांना अल्प दरात परवडेल अशी चांगल्या प्रकारची अत्याधुनिक जीम करणार हा संकल्प केला होता,हा संकल्प पूर्ण केल्यामुळे अधिक काम करण्याची नक्कीच ऊर्जा मिळाली आहे.  रस्ता, ड्रेनेज, पाणी, या नागरिकांच्या दैनंदिन समस्या पूर्ण करत असतानाच नागरिकांची काय आवश्यकता आहे आणि ती पूर्ण करणे ही लोकप्रतिनिधी या नात्याने माझे कर्तव्य आहे.  ते पूर्ण करण्याचे समाधान पेहलवान जीमच्या माध्यमातून मिळाले. आपल्या सर्वांना आश्वासन देतो आगामी काळात अनेक चांगले उपक्रम नागरिकांच्या हितासाठी करण्याचा चांगला प्रयत्न करेल.

Img 20201213 wa0074

आमचा Teligram group सबस्क्राईब करा – सिंहासन NEWS
Pune local news
https://t.me/sinhasannews

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये