लोकांची कामे केली की, लोक लक्षात ठेवतात- शरद पवार

नगरसेवक सचिन दोडके यांच्या प्रयत्नातून झालेल्या विकासकामांचे शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे : लोकांची कामे केली की, लोक पण आपल्याला लक्षात ठेवतात. हा अनुभव मी माझ्या आयुष्यात घेतला आहे. सचिन देखील लोकांची कामे करत आहे. त्याला निश्चित यश मिळणार असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. People do not forget the development work done
वारजे येथील नगरसेवक सचिन दोडके यांनी केलेल्या विविध विकासकामांचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. पवार म्हणाले, वारजे चा हा परिसर आता फारच बदलला आहे. पूर्वीची शेती जाऊन नव्या नव्या सोसायट्या उभ्या राहिल्या आहेत. मात्र तरी लोकांना या भागात विकासाची गरज आहे. ती अशा कामांच्या माध्यमातून पुर्ण होत आहे.

यावेळी वारजे परिसराच्या विकासाबरोबरच वारजे च्या सौंदर्यात ही भर पडत असून नगरसेवक सचिन दोडके यांच्या प्रयत्नातून झालेल्या वारजेतील विविध सुशोभीकरण कामांचे , महानगरपालिकेच्या माध्यमातुन उभारण्यात आलेल्या ४५ मीटर उंचीच्या राष्ट्रध्वजाचे व वारजेत पहिल्यादांच घेण्यात येत असलेल्या सुंदर फुलांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी खासदार सुप्रिया सुळे, कार्यक्रमाचे संयोजक व नगरसेवक सचिन दोडके, पालिकेतील विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, नगरसेवक दिलीप बराटे, नगरसेवक दीपक मानकर, नगरसेविका सायली वांजळे, लक्ष्मी दुधाने आदी उपस्थित होते.
वारजे परिसरामध्ये सध्या अतिशय सुंदर असे सूशोभिकरण करण्यात आल्याचे पहायला मिळत आहे. या सुशोभीकरणामुळे वारजे परिसराचा विकास होत असताना त्याच्या सौंदर्यात ही भर पडत आहे. वारजेकरांना २३ जानेवारी ते २७ जानेवारी दरम्यान सुंदर फुलांचे प्रर्दशन अनुभवता येणार आहे.



ही एक वेगळीच पर्वणी वारजेकरांसाठी असणार आहे.
सुमारे १७ गुंठे जागे मध्ये हे प्रर्दशन लावण्यात येणार आहे. आतापर्यंत फुल प्रदर्शन म्हंटले की आपल्याला छत्रपती संभाजी महाराज उद्यान किंवा फुलपाखरू उद्यानात जावे लागते पण आता वारज्यामध्ये प्रथमच अशा प्रकारचे विविध फुलांचे प्रर्दशन भरवण्यात येणार आहे.
वारजे परिसरामध्ये पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातुन ४५ मीटर उंचीचा राष्ट्रध्वज उभारण्यात आला आहे. याचबरोबर वारजेकरांसाठी l love warje असा एक आपल्या वारजेचा अभिमान वाटावा असा सेल्फी पॉइंट आरएमडी काॅलेज समोर लावण्यात आला आहे. तसेच ६०० मीटर भिंतीवर मनाला मोहणारे चित्र रेखाटण्यात आले आहे. या सर्व गोष्टीमुळे वारजे परिसराचे नेत्रदीपक दृश्य वारजेकरांना अनुभवायला मिळणार असल्याचे सचिन दोडके यांनी सांगितले.



