पुणे शहर

कोथरूड मधून १,४२० नागरिकांचे मोदींना पत्र.

गॅस सबसिडी देणे आणि इंधन दरवाढ कमी करा. मनसेची मोहीम सुरू.

पुणे : पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना नागरिक मनसेच्या माध्यमातून पत्र लिहून “गॅस सबसिडी देणे आणि इंधन दरवाढ कमी करा” हि मागणी करणार आहेत.ह्याच संदर्भात मनसेच्या वतीने आज कोथरूड भागातील पेट्रोल पंप वर समबंधीत पत्रांवर नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या.

मनसे कोथरूड विभाग विभाग अध्यक्ष सुधीर धावडे यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी 11 वाजता महर्षी कर्वे पुतळा चौक येथील लोढा पेट्रोलियम येथे मनसे कोथरूड विभागातील शेकडो महाराष्ट्र सैनिकांनी ह्यात सहभाग घेतला. यावेळी राम बोरकर, सुरेखा होले, सुभाष शिंदे, संजय काळे, राजेंद्र वेडेपाटील, संतोष वाघमारे, गणेश शिंदे, सचिन विप्र, अरुण हुलावळे,आनंद पाटील, दत्ता पायगुडे, रमेश उभे, अशोक कदम, बाळा शिंदे, पांडुरंग सुतार, सुभाष आमले, श्रेयस राऊत, हर्षल खाडे, योगेश वाव्हळ, महेश देवळेकर, अमित पिसाळ, यश भिलारे ह्यांच्या सह कोथरूड विभागातील सर्व  पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Img 20210116 wa0007

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये