पुणे शहर

रस्तारूंदीची सुनावणी हा महापालिका आयुक्तांचा फार्स- उज्वल केसकर

पुणे : गुरूवारी सकाळी ११ वाजता ६ मीटर ते ९ मीटर कलम २१० रस्तारूंदी या विषयावर महापालिकेत सुनावणी होती. या सुनावणीला माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे उपस्थित होते. मात्र पालिका आयुक्तांनी सुनावणी न घेता अधिकार पत्र नसलेल्या अधिकाऱ्यांनी सुनावणी घेतली. त्यामुळे ही सुनावणी बेकादेशीर असल्याचा आरोप करीत केसकर यांनी पुन्हा सुनावणी घेण्याची मागणी केली आहे.

Img 20210116 wa0007

केसकर म्हणाले,  MMC Act कलम 210(1)(b) हा महानगरपालिका आयुक्त यांचा रस्त्याची प्रमाणरेषा निश्चित करण्याचा अधिकार असल्याने याविषयावर सुनावणी त्यांच्यासमोर होणे कायद्यानुसार आवश्यक आहे किंवा त्यांनी अधिकार पत्र दिलेल्या अतिरिक्त आयुक्त, नगरअभियंता अथवा तत्सम अधिकाऱ्यांसमोर होणे आवश्यक आहे आम्ही श्री प्रसन्न राघव जोशी कार्यकारी अभियंता पुणे मनपा यांच्याकडे सुनावणीसाठी गेलो असताना अशा अधिकार पत्राची मागणी केली असता असे अधिकार पत्र आम्हास दिले नाही असे त्यांनी आम्हाला सांगितले त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांकडे अधिकार पत्र आहे त्यांच्याकडे अथवा मनपा आयुक्तांकडे सुनावणी होणे आवश्यक आहे म्हणून आजची सुनावणी आम्ही तहकूब करून पुन्हा घेण्याची मागणी केली.

Img 20210128 wa0172


        
त्यामुळे आजपर्यंत झालेल्या सुनावण्या ह्या कोणतेही अधिकार पत्र नसताना घेण्यात आल्या आहेत याचा अर्थ मनपा आयुक्त बेकायदेशीर काम करून पुणेकरांची दिशाभूल करित आहेत. असे उज्ज्वल केसकर यांनी सांगितले.
         

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये