पुणे शहर

मोठी बातमी: पुण्यात कोरोना वाढला; 42 कंटेन्मेंट झोन, ‘हा’ भाग ठरतोय हॉटस्पॉट बाहेरील व्यक्तीस प्रवेश मनाई

पुणे: गेल्या काही दिवसांपासून पुण्यात pune कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असल्यामुळे आता महानगरपालिकेने कठोर पावले उचलली आहेत. त्यासाठी पुण्यातील 10 क्षेत्रीय कार्यालयांच्या विभागात 42 कंटेन्मेंट झोन निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये हडपसर परिसरात सर्वाधिक पाच कंटेन्मेंट झोन आहेत. त्यामुळे हडपसर परिसर सध्या पुण्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरताना दिसतोय. पुणे महानगरपालिकेकडून यासंदर्भात अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार मोठ्या इमारतींमध्ये रुग्ण सापडल्यास ती संपूर्ण इमारत सील करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. Corona grows in Pune; 42 Containment zones, ‘this’ part of the hotspot is barred from entering

Img 20210303 wa0016

गेल्यावर्षी राज्यात कोरोनाची साथ आली तेव्हा पुणे हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. सुरुवातीच्या काळात पुण्यात कोरोनामुळे अनेक रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आता पुणे जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे.

Img 20210223 wa0156

पुण्यातील मायक्रो कंटेंटमेंट झोन

शिवाजीनगर ४
सिंहगड रस्ता ४
वानवडी रामटेकडी ३
वारजे कर्वेनगर ४
हडपसर मुंढवा ७
कोंढवा येवलेवाडी २
भवानी पेठ ५
धनकवडी सहकारनगर ५
बिबवेवाडी ५
नगर रस्ता वडगाव शेरी ३

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये