बावधन मधील नागरिकांसाठी कोरोना लसीकरण केंद्रावर जाण्या – येण्यासाठी नगरसेवक किरण दगडे पाटिल यांच्याकडून व्यवस्था

कोथरूड : ज्येष्ठ नागरिकांसाठी नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्यावतीने कोविड -19 लसीकरण मोहीमेला सहकार्य म्हणून बावधनमध्ये कोरोना लसीकरण केंद्रावर जाण्या – येण्यासाठी नगरसेवक किरण दगडे पाटिल यांच्या कडून व्यवस्था करण्यात आली आहे.
नगरसेवक किरण दगडे पाटील व सरपंच पियुषा किरण दगडे पाटील यांच्यावतीने प्रभाग क्र. 10 व बावधन ग्रामपंचायत मधील ज्येष्ठ नागरिकांच्या कोविड -19 लसीकरणच्या तसेच ज्येष्ठ नागरिक नसलेल्या परंतु अन्य आजार असलेल्या (हृदयरोग,मधुमेह इत्यादी) नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्या वतीने ऑनलाइन नोंदणीची सर्व प्रक्रिया करून तसेच दोन दिवसांमध्ये 50 ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण सेंटरवरून जाण्या-येणाची व्यवस्था स्वखर्चाने करून लसीकरण करण्यात आले अजुनही ऑनलाईन नोंदणी सुरू असून नागरिकांचा देखील मोठ्या प्रमाणावर उत्स्फुर्त प्रतिसाद आहे.




