कोथरूडमध्ये दिशा मोफ़त कायदेशीर सल्ला केंद्राचे उद्घाटन

पुणे : जागतिक महिला दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी पुणे शहर महिला आघाड़ीच्या वतीने गोसावी वस्ती कोथरूड येथे दिशा मोफ़त कायदेशीर सल्ला केंद्राचे उद्घाटन भाजपा महिला आघाड़ी प्रदेश अध्यक्ष उमा खापरे ,पुणे शहर भाजपा महिला अध्यक्ष मा. अर्चना पाटिल, यांच्या हस्ते झाले.गोरगरिब महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आणि त्या महिलांना मोफत कायदेशीर मार्गदर्शन व्हावे म्हणून या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना भाजप महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष उमा खापरे म्हणाल्या ” महिला सशक्तीकरण म्हणजे केवळ महिलांना बळ देणे नाही तर त्यांच्या अंतर्गत बळाची, त्यांच्या शक्तीची त्यांना जाणीव करून देणे आहे,महिला रोज वेगळवेगळ्या पातळीवर लढत असतात,त्यात त्यांना अडी अडचणी येतात.त्या अडचणी सोडवताना बऱ्याचदा कायद्याचे ज्ञान असावे लागते. ही सुविधा आपण त्यांच्या मदतीसाठी, त्यांना दिशा दाखवण्यासाठी उपलब्ध करून दिली आहे.याचा वस्ती विभागातील गरजू महिलांना निश्चितच उपयोग होइल असेही त्या म्हणाल्या.

या कार्यक्रमाला भाजपा पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर,नगरसेविका शिक्षण समिती अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर , नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, नगरसेविका वृषाली चौधरी, नगरसेविका अल्पना वरपे, नगरसेविका हर्षाली माथवड,नगरसेवक दीपक पोटे , नगरसेवक जयंत भावे,ॲड.मीताली सावळेकर,महिला आघाडी महाराष्ट्र सचिव वर्षा डहाळे, पुणे शहर भाजपा चिटणीस अनिता तलाठी,पुणे शहर महिला आघाड़ी सरचिटणीस कांचन कुंबरे, रेश्मा सय्यद, सोनाली भोसले, सुप्रिया खैरनार,कल्पना पुरंदरे,कोथरूड महिला आघाडी अध्यक्षा हर्षदा फरांदे, प्राची बगाटे व इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
कल्याणी खर्डेकर यांनी आपल्या प्रास्ताविकात ह्या केंद्राच्या स्थापने मागची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की शक्यतो कोणत्याही प्रकारचे क्षुल्लक कौटुंबिक वाद हे परस्पर सामंजस्याने सोडविले जावेत अशीच भूमिका असणार आहे,मात्र जर काही विषयात वस्ती विभागातील भगिनींना कायदेशीर सल्ला हवा असेल तर तो ह्या केंद्राच्या माध्यमातून मोफत उपलब्ध होइल.दर शनिवारी दुपारी ४ ते ६ या वेळेत ॲड.मिताली सावळेकर व ॲड.प्राची बगाटे मोफत मार्गदर्शन करतील असेही सौ. खर्डेकर यांनी सांगितले.यावेळी महिलांना कोरोना पासून बचावासाठी त्रिसूत्री चे पालन करण्याची सूचना करण्यात आली व त्यांना मास्क वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन महिला आघाडी आयटी प्रकोष्ठ संयोजिका पुणे शहर कल्याणी खर्डेकर यांनी केले,गायत्री काळभोर यांनी सूत्रसंचालन तर जयश्री तलेसरा यांनी आभार प्रदर्शन केले.



