बावधनकर आक्रमक ; प्रांत इमारतीच्या नियोजित जागेविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा

पुणे : बावधन येथील प्रस्तावित मावळ प्रांत इमारतीच्या नियोजित जागेच्या विरोधात बावधनकर आक्रमक झाले आहेत. नियोजित जागेऐवजी बावधनमधील दुसरी जागा इमारतीसाठी घ्यावी, यासाठी येथील नगसरेवक किरण दगडे पाटील व सरपंच पियुषा दगडे पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांना आपल्या मागणीचे निवेदन दिले आहे. महसूल मंत्र्यांशी बोलून यावर गावाच्या हिताच्या निर्णयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिले आहे. सार्वजनिक हिताची व गरजेची असलेली जागा शासकीय इमारतीसाठी घेण्याऐवजी दुसरीकडे उपलब्ध असलेली जागा वापरावी, असे नगरसेवक किरण दगडे यांनी यावेळी सांगितले.Warning of intense agitation against the planned site of Bavdhankar Aggressive Province building

बावधन मध्ये गायरान जमिनीपैकी 90% क्षेत्र आतापर्यंत वेगवेगळ्या संस्था व सरकारी खात्याना वाटप केल्या आहेत परंतु गावासाठी एकही जागा शिल्लक नाही त्यामुळे मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण देखील उपलब्ध करून देता येत नाही आणि ज्या संस्थांना वाटप केले आहे तिथे जागेवर बांधकाम न करता फक्त ताब्यात जागा ठेवल्या होत्या, त्यातच आता याच महिन्यात 3 तारखेला उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासाठी उर्वरीत जागेवर निधी मंजूर करण्यात आला त्यांनी कळविले आहे की त्यामधून या कामासाठी क्षेत्र घेणार आहे तिथेच गावची यात्रा,शाळेतील मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण, कुस्ती स्पर्धा, यासाठीच सध्या ते वापरात आहे पण त्यांनी जर तीच जागा ताब्यात घेतली तर गावाला सार्वजनिक प्रयोजनासाठी, लहान मुलांसाठी,ज्येष्ठ नागरिकांसाठी जागा शिल्लक राहणार नाही पण त्याबाजूला अगोदरच ताब्यात घेतलेल्या केळकर संग्रहालय, महसूल प्रशिक्षण केंद्र या जागेतही अजून भरपूर क्षेत्र शिल्लक आहे तिथे तुम्ही कार्यालय करा त्याला काहीही हरकत नाही



पण उर्वरीत जागेवर जर हे होणार असेल तरआमच्या गावाचा या सर्व जमीन वाटपाला तीव्र विरोध आहे आणि बळजबरीने घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही मोठे गावच्या वतीने जनआंदोलन उभारू आमच्या गावच्या हक्काची जागा आम्ही कुणालाही यापुढे घेऊन देणार नाही आणि हाच प्रश्न आज सरपंच, उपसरपंच, ग्रा.प.सदस्य व ग्रामस्थांच्या वतीने भा.ज.पा. प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील यांना विधानसभेत बावधन गावावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी निवेदन देण्यात आले , त्यावेळी दादांनी सांगितले की तात्काळ मी महसूलमंत्री मंत्री यांच्यासोबत चर्चा करून आपण ती जागा गावाकडेच राहील यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न करू



