कोथरुड

कोथरुड मधील भारतीनगर, पुजा पार्क येथील विवीध विकास कामांचे भिमराव तापकीर यांच्या हस्ते भूमिपूजन…

कोथरुड : प्रभाग क्र. १० (कोथरूड डेपो-बावधन खुर्द) नगरसेविका अल्पना वरपे यांच्या महापालिकेच्या विकास निधीतून भारतीनगर, पुजा पार्क येथील रस्त्याचे काँक्रीटीकरण, लेन काँक्रीटीकरण,पावसाळी लाईन टाकणे, ड्रेनेज लाईन टाकणे अशा कामांचे भूमिपूजन खडकवासला मतदार संघाचे कार्यक्षम आमदार मा.भिमरावआण्णा तापकीर यांच्या हस्ते व मा.बाबाशेठ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या कामांसाठी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. Bhumi Pujan at the hands of Bhimrao Tapkir for various development works at Bharatinagar, Puja Park in Kothrud …

या वेळी बोलताना तापकीर म्हणाले,  रस्ते, पाणी, ड्रेनेज लाईन, समाज मंदिरे, उद्याने याच बरोबर अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले ओपन स्पेस ताब्यात घेणे व डीपी रोड मधील अडथळे दूर करून रस्ते रूंदिकरण करणे या सारखे प्रश्न सुद्धा नगरसेवकांनी मार्गी लावले आहेत याचा  स्थानिक आमदार म्हणून मला अभिमान वाटतो. 

Img 20210223 wa0156

यावेळी  नगरसेवक दिलीप वेडेपाटील, नगरसेवक किरण दगडेपाटील, बाबा शिंदे, प्रदेश युवामोर्चा चिटणीस अॅड गणेश वरपे,  पै.धनंजय दगडेपाटील, गायत्री राहुल जाधव, प्रदिप जोरी, राजेश कुलकर्णी, कैलास मोहोळ, गणेश कोकाटे, सुरेंद्र कंधारे, राजेश मनगिरे, राजाभाऊ जोरी, अक्षय ढाकणे, शंतनु नारके, सुहास साठे, कृष्णा भंडारी, अभिजीत धुमाळ, गायत्री काळभोर,सुप्रिया माझिरे,विद्या टेमकर,अमरजा पटवर्धन,गायत्री सणस,सुहासिनी शिराढोणकर, ओंकार मारणे, अॅड.उमेश दिवाणे उपस्थित होते. यावेळी स्विकृत सदस्य वैभव मुरकुटे यांनी सूत्रसंचालन केले तर सागर कडू यांनी आभार मानले.

Img 20210313 wa0048

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये