कोथरुडमध्ये महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरट्यांनी केले पलायन..

कोथरुड : कोथरुड मधील उजवी भुसारी कॉलनी येथे पायी चालणाऱ्या महिलेच्या गळयातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरांनी हिसका मारून चोरून नेले आहे. कोथरुडमध्ये चैन स्नॅचिंगचा प्रकार घडत असल्याने याबाबत पोलीस प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी आता नागरिकांकडून करण्यात येऊ लागली आहे. In Kothrud, thieves snatched the Mangalsutra from a woman’s neck and fled.
या संदर्भात संबधित महिलेने कोथरुड पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली असून अज्ञात व्यक्ती विरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रविवार दिनांक २९ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे.
पौड रस्त्यावरील उजवी भुसारी कॉलनीतील रूणवाल सिंक्लेअर सोसायटी येथे पार्किंगमध्ये यातील फिर्यादी महिला पायी जात असताना, दुचाकीवरून आलेल्या दोघाजणांनी त्यांच्या गळयातील २५ हजार किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र हिसका मारून,तोडुन चोरून नेले आहे. या घटनेचा सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही.के. बाबर पुढील तपास करत आहेत.




