पुणे शहर

जलपर्णी समूळ निर्मूलनासाठी ‘आयसर’शी संपर्क साधणार-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : नदीपात्रामध्ये वाढणाऱ्या जलपर्णीचे समूळ निर्मूलन व्हावे याकरिता आयसर ( इंडियन इन्स्टी. ऑफ सायन्स, एज्युकेशन रिसर्च ) या संशोधन संस्थेशी संपर्क साधून त्यांची मदत घेतली जाईल, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले.

नदीपात्रातील जलपर्णी निर्मूलनाचे काम खडकी, औंध, बोपोडी भागात चालू आहे. या कामाची पाहाणी अतिरिक्त आयुक्त सुरेश जगताप आणि औंध क्षेत्रीय कार्यालय अधिकारी जयदीप पवार यांच्यासमवेत आमदार शिरोळे यांनी बुधवारी केली. येत्या पंधरा दिवसात जलपर्णी निर्मूलनाचे काम पूर्ण होईल, असे अधिकाऱ्यांनी आमदार शिरोळे यांना सांगितले.

Img 20210223 wa0156

या पाहणी दौऱ्यात आमदारांसमवेत नगरसेविका सुनिता वाडेकर, शिवाजीनगर मतदारसंघ भाजपचे सरचिटणीस आनंद छाजेड, सोनाली भोसले, सुप्रिया खैरनार, गणेश नाईकरे, उत्तम बहिरट, सचिन वाडेकर, अनिल भिसे, सौरभ कुंडलीक, सुप्रीम चौंडे, रोहित भिसे, जय जोशी आदी सहभागी झाले होते.

Img 20210313 wa0015

जलपर्णी निर्मूलनासाठी राज्य सरकारने यंत्रणा आणि तंत्रज्ञान पालिकांना द्यावे, अशी मागणी पालकमंत्री अजित पवार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये