पुणे शहर
बावधन बुद्रुक मध्ये कोविड लसीकरण केंद्र सुरू..

बावधन : पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने व बावधन ग्रामपंचायत च्या सहकार्याने ४५ वर्षावरील नागरिकांना मोफत लसीकरणासाठी बावधन बुद्रुक मध्ये बापूजीबुवा मंदिराजवळील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू व्हावे यासाठी सरपंच पियुषा किरण दगडे पाटील व नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्याकडून पाठपुरावा करण्यात आला. Covid Vaccination Center started in Bawadhan Budruk.
यावेळी पंचायत समिती सदस्य महादेव कोंढरे, उपसरपंच दिपक दगडे , सर्व ग्रामपंचायत सदस्य नागरिकांची उपस्थिती होती. पहिल्या दिवशी २१९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. या लसीकरण केंद्रामुळे परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय दूर झाली असल्याचे किरण दगडे पाटील यांनी सांगितले.




