पुणे शहर

गेल्या २४ तासात पुण्यात सर्वात नीचांकी रूग्णसंख्या…

पुणे : पुणे शहरात कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे.मागील दोन महिन्यात पुण्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढली होती मात्र आता नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढल्याने मोठा दिलासा मिळाला आहे तसेच शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या घटली आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 180 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.(Lowest number of patients in Pune in last 24 hours)

पुणे शहरात आत्तापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या चार लाख 69 हजार 927 वर पोहोचली आहे.पुणे शहरात दिवसभरात ३३ जणांचा मृत्यू झाला आहे.त्यामध्ये 24 रुग्ण शहरातील आहेत तर नऊ रुग्ण शहराबाहेरील आहेत आत्तापर्यंत 8256 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान 751 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

Img 20210522 wa0203

आज पर्यंत 425561 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहे आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 4 हजार 439 रूग्ण तपासणी करण्यात आली.आजपर्यंत 24 लाख 96 हजार 637 चाचण्या करण्यात आल्या आहेत. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 6020 इतकी आहे यापैकी 844 जण गंभीर आहेत तर 1581 जण ऑक्सिजनवर आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये