महाराष्ट्र

कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या कारचा अपघात

जालना : कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या कारचा अपघात झाला आहे. जालन्यात त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास परतूरमध्ये हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. सुदैवाने अपघातातून इंदुरीकर महाराज बचावले आहेत. त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. दरम्यान त्यांच्या गाडीचा चालक मात्र अपघातात जखमी झाला आहे.

इंदुरीकर महाराज गाडीने परतूर येथील खांडवी वाडी येथे जात होते. यावेळी इंदुरीकर महाराज यांच्या स्कॉर्पिओ गाडीने ट्रॅक्टरला धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच तेथील स्थानिकांनी घटनास्थळी पोहोचत मदत केली. सुदैवाने अपघातात इंदुरीकर महाराज जखमी झाले नाहीत. त्यांचा चालक मात्र किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

Img 20220414 130128 501 1
Fb img 1648963058213
Img 20220414 wa0001

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये