पुणे शहर

कोथरूड ते पाषाण बोगदा तसेच पुणे शहरातील बोगद्यांच्या कामाला वेग येणार

पुणे : पुणे शहरातील पाषण ते कोथरूड वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि सेनापती बापट रस्त्यावर येणारा ताण कमी करण्यासाठी प्रस्तावित असणाऱ्या पंचवटी, पाषाण ते कोथरूड आणि पंचवटी, पाषाण ते गोखले नगर या दोन्ही बोगद्यांच्या कामाला गती येणार असून या संदर्भात पालकमंत्री अजित पवार यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. या बैठकीनंतर पालकमंत्र्यांनी या दोन्ही बोगद्यांच्या कामाला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.(Work on Kothrud to Pashan tunnels as well as tunnels in Pune city will be accelerated)

बोगद्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आणि कामाला गती देण्याच्या उद्देशाने आज बैठक पार पडली. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ,आमदार सिद्धार्थ शिरोळे, आयुक्त विक्रम कुमार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला उपस्थित होते.

Img 20210522 wa0203

कोथरूड ते पाषाण हे सध्याचे अंतर चांदणी चौकमार्गे साडे आठ किलोमीटर तर सेनापती बापट रोडमार्गे हेच अंतर साडेनऊ किलोमीटर इतके आहे. बोगदा पूर्ण झाल्यावर हेच अंतर चार किलोमीटर इतके होणार आहे. तर पाषाण रोड ते गोखलेनगर हे अंतर सव्वा चार किलोमीटर असून बोगदा झाल्यावर हेच अंतर २.९०० किलोमीटर होणार आहे. कोथरूड ते पंचवटी या बोगद्याची लांबी १ हजार ०९० मीटर तर पंचवटी ते गोखलेनगर या बोगद्याची लांबी ५८० मीटर इतकी आहे. या भागातील वाहतुकीमुळे होणारी कोंडी या बोगद्यांच्या कामानंतर निश्चितच कमी होणार आहे.

या कामासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली होती. मात्र वेळेत काम पूर्ण न केल्याने सल्लागार बदलण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सल्लागार बदलाच्या प्रक्रियेला प्रतिसाद मिळाला असून चर्चा करून सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे आता या दोन्ही बोगद्यांच्या कामाच्या शासकीय परवानग्या तातडीने मिळणार आहेत. असेही मोहोळ यांनी सांगितले.

Img 20210619 wa0147

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये