बावधनमध्ये रस्त्यावर साठत असलेल्या पावसाच्या पाण्याबाबत उपाययोजना करा : कुणाल वेडे पाटील

बावधन : मेघ मल्हार रागा ते रिद्धी सिद्धि दरम्यानच्या रस्त्यावर तसेच एलएमडी चौका जवळ मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साठत असून त्यामुळे स्थानिकांना त्रास होत आहे. त्यामुळे यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे खडकवासला मतदार संघाचे अध्यक्ष कुणाल वेडे पाटील यांनी केली आहे. Take action measures against rain water accumulating on the roads in Bawadhan: Kunal Vede Patil
लोकप्रतिनिधिंच्या दुर्लक्षामुळे व प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनमुळे बावधनमध्ये पहिल्याच पावसात जागो जागी पाणी साठून राहिले आहे. लोकप्रतिनिधी यांनी 4 वर्षापूर्वी जलतरण तलाव तयार करणार असे आश्वासन बावधनकरांना दिले होते. पावसाच्या पाण्यामुळे जागो जागी तयार झालेली पाण्याची तळी म्हणजेच हेच ते जलतरण तलाव आहेत का ? असा सवाल कुणाल वेडे पाटील यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे.




