सावधान : सायंकाळी सात वाजता खडकवासला धरणातून २४ हजार क्यूसेक्स वेगाने पाणी सोडले; विसर्गात वाढ होण्याची शक्यता.

पुणे : आज सलग दुसऱ्या दिवशी (शुक्रवारी, ता.२३) खडकवासला धरणातून सायंकाळी ७:०० वा. २४,०५६ क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. पावसाचा अंदाज पाहता यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. याची नागरीकांनी नोंद घ्यावी व खबरदारी घ्यावी. असे आवाहन पुणे महापालिकेने केले आहे.(Warning: At 7 pm, water was released from Khadakwasla dam at a speed of 24,000 cusecs. Likely to increase further.)
खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या ४८ तासापासून मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे खडकवासला धरणातून काल (गुरुवारी ता.२२) सायंकाळी सात वाजल्यापासून मुठा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.धरणाची पाणी पातळी 95 टक्के पेक्षा जास्त झाल्याने काल रात्री आठ वाजता धरणातून 10000 क्युसेक्स पाणी मुठा नदीपात्रात सोडण्यात येत होते. रात्री दहा वाजता हा पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला असून १८ हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत होते. यानंतर रात्री ११वाजता हा विसर्ग २५हजार क्यूसेक्स वेगाने एवढा वाढविण्यात आला होता.
शुक्रवारी पहाटे पावसाचा जोर कमी झाल्याने विसर्ग कमी करण्यात आला होता. मात्र आज दिवसभरात पावसाचा जोर वाढल्याने दुपारनंतर धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा एकदा २४ हजारापर्यंत वाढविण्यात आला आहे. पावसाचा अंदाज पाहता यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे

खडकवासला धरणातून सायंकाळी ७:०० वा. २४,०५६ क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. पावसाचा अंदाज पाहता यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. याची नागरीकांनी नोंद घ्यावी व खबरदारी घ्यावी. #punefloodalert #PMC #पुणे_महानगरपालिका
— PMC Care (@PMCPune) July 23, 2021






