पुणे शहर

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्य उत्पादन शुल्क, सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी संघाच्या वतीने रक्तदान शिबिर..

पुणे :  राज्य उत्पादन शुल्क, सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी संघ तसेच काला क्रीडा व कल्याण संघटना जिल्हा पुणेच्या वतीने मंगळवार पेठ, वेअर हाऊस येथे राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थ नियोजन व राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले होते. शिबिरात एकूण ७५ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत रक्तदान केले. Blood donation camp on behalf of State Excise, Retired Officers and Employees Union on the occasion of Ajit Pawar’s birthday.

रक्तदान शिबिराची सुरुवात विभागाचे विभागीय उपायुक्त  प्रसाद सुर्वे व पुणे जिल्ह्याचे अधिक्षक तसेच कला क्रिडा व कल्याण संघटनेचे अध्यक्ष संतोष झगडे यांनी रक्तदान करून केली. सेवानिवृत्त संघाचे तसेच कला क्रिडा व कल्याण संघटनेचे प्रतिनिधी एस.के.सुपाते, जयवंतराव निंबाळकर, एच.टी.कानेटकर, एन.के.बुराहे, के.एस.पवार व प्रकाश रेणुसे उपस्थित होते.

रक्तदात्यांना सेवानिवृत्त संघटनेचे अध्यक्ष के. सी. शेलार यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रके देऊन गौरविण्यात आले. सदरचे शिबिर यशस्वी करण्यात कला क्रिडा व कल्याण संघटनेचे सहसचिव तानाजी शिंदे यांचा मोलाचा वाटा होता. सदरचे शिबिर केईएम, ससून रक्तपेढी, आधार ब्लड बँक व रक्ताचे नाते ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषद या रक्तपेढ्यांच्या सहकार्याने पार पडले. शिबिरात एकूण
७५ रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला.

Img 20210707 wa0004

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये