पुणे शहर

जागतिक मैत्री दिनी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ हडपसर शाखेने केली झाडांशी मैत्री

पुणे : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ हडपसर शाखेच्या वतीने जागतिक मैत्री दिनाचे औचित्य साधत दिवेघाट येथील ऐतिहासिक मस्तानी तलाव येथील टेकडीवर वृक्षारोपण केले. वड, पिंपळ, नीम अशा देशी झाडांचे रोपण यावेळी करण्यात आले.

आजच्या या उपक्रमाचे वैशिष्ट ठरले ते श्री व सौ सुयोग कुलकर्णी या अंध दाम्पत्याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन सामाजिक बांधिलकी जपत वृक्षारोपण केले व समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला. ज्या झाडांमुळे आपल्याला oxygen मिळतो, सावली मिळते त्या झाडांचे संगोपन करण्याची प्रतिज्ञा यानिमित्ताने याप्रसंगी घेण्यात आली.

या उपक्रमाचे आयोजन हडपसर शाखेचे सरचिटणीस  आकांशा देशपांडे  व कार्यकारी सदस्य विवेक कानडे यांनी केले होते. आजच्या या वृक्षारोपणाला अतुल कुलकर्णी, अभिजित देशपांडे, संतोष वैद्य, राजेंद्र कुलकर्णी, जयश्री घाटे, प्रकाश गोखले, पंकज पतके, सुयोग कुलकर्णी हे सर्व पदाधिकारी कुटुंबासमवेत सहभागी झाले. जिल्हा कार्याध्यक्ष मंदार रेडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा केतकी कुलकर्णी उपस्थित होते.

पर्यावरणाची आवड पुढील पिढीला निर्माण व्हावी हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन अनेक लहान मुलांनी त्यांचा सहभाग नोंदवला व झाडें लावली. वृक्षमित्र संस्थेचे विनायक पाटील व त्यांच्या टीमचे या सर्व नियोजनात विशेष सहकार्य लाभले.

Img 20210727 wa0218

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये