पुणे शहर

पुणे मेट्रो ट्रायल वरून अमृता फडणवीस यांची सरकारवर जोरदार टीका..

पुणे : नुकतीच पुणे मेट्रोची कोथरुड मध्ये वनाज ते आयडीएल चौक दरम्यान ट्रायल पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ही ट्रायल सुरू झाली. या विषयावरून अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला असून काम एक करतं आणि हार दुसरेच घालून जातात, अशा शब्दात त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. Amrita Fadnavis criticizes the government from Pune Metro ..

एरंडवणा मधील मनोहर मंगल कार्यालय येथे भाजपा राष्ट्रीय महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा व माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी आयोजित केलेल्या धागा हॅन्डलूम महोत्सवाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी बोलताना पुण्याच्या निर्बंधाबाबत ही त्यांनी वक्तव्य केले. ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह रेट जास्त आहे त्या ठिकाणचे निर्बंध शिथिल केले पण पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट कमी असताना देखील येथील निर्बंध शिथिल का गेले नाहीत हेच कळत नाही असे त्या म्हणल्या.   

भव्य हँडलूम प्रदर्शन
राष्ट्रीय हातमाग दिवसाचे औचित्य साधून हातमाग कलाकृतींचे प्रदर्शन,  5 आणि 6 ऑगस्ट रोजी मनोहर मंगल कार्यालयात  आयोजित करण्यात आले आहे.
उच्च दर्जाच्या सिल्क आणि कॉटन हातमाग साड्या, कुडते,  जॅकेट्स, ब्लॉक प्रिंटेड कपडे, बेडशीट्स, रेडीमेड्स,  इतर कपडे ,वस्तू इथे उपलब्ध आहेत.

Img 20210727 wa0218

कर्वेनगर मधील उद्यानात धक्कादायक प्रकार

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये