कोथरुड बावधन क्षेत्रिय कार्यालयाची पहिल्या दिवशी जनजागृती तर दुसऱ्या दिवशीच्या कारवाईत ४७००० रुपये दंड वसूल..

कोथरुड : pune city, kothrud कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालय पुणे महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने ” स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ सर्वेक्षण २०२१” अन्वये प्रभाग क्रं.१२ डहाणूकर कॉलनी व कोथरूड गांवठाण हजेरी कोठी अंतर्गत ” स्वच्छतेपासून मुक्तता तसेच प्लॅस्टिक मुक्त पुणे शहर जनजागृती अभियान राबवण्यात आले. या जनजागृती अभियानाच्या दुसऱ्याच दिवशी अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत ८७ किलो प्लास्टिक जप्त करत व्यापाऱ्यांकडून ४७ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालय पुणे महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या प्लास्टिक मुक्त अभियानात प्लॅस्टिक मुक्त पुणे शहर करण्यासाठी महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांबरोबर व्यापारी संघटनेचे कोथरूड विभागाचे अध्यक्ष शशिकांत उभे व अन्य त्यांचे सहकारी पदाधिकारी, भाजी विक्रेते, फळ विक्रेते, पथारीवाले व नागरिक जनजागृती कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
सूर्यमुखी असतील ते मला शिव्या देत असतील ; अजित पवार
सदर अभियानात “कागदी व कापडी पिशव्यांचा वापर करा, प्लॅस्टिकचा भस्मासूर करील पृथ्वीचा विनाश, प्लॉस्टिकचा वापर टाळा वन्य व प्राणि जीवनाची हानी टाळा, प्लॉस्टिक घालवा पृथ्वी वाचवा,” अशाप्रकारचे प्लॅस्टिक मुक्तीचे फलक हातात घेऊन डहाणूकर कॉलनी, लक्ष्मीनगर, कोथरूड गांवठाण, मंत्री पार्क, बधाई चौक, भेलके नगर चौक, कुर्वे पुतळा चौक, शिवाजी पुतळा चौक, तेजस नगर परिसरात जनजागृती करण्यात आली.

जनजागृती नंतर दुसऱ्या दिवशी आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य निरिक्षक व कर्मचारी यांनी पहाणी केली असता सदर भागातील चिकन व मटन विक्रेते, फळ विक्रेते, भाजीवाले, पथारीवाले, हातगाडीवाले तसेच काही व्यापारी ५० मायक्रॉन पेक्षा कमी जाडीचे प्लॅस्टिक वापरत असल्याचे निदर्शनास आले.



महापालिका सहाय्यक आयुक्त सचिन तामखडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ आरोग्य निरिक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य निरिक्षक सचिन लोहकरे, करण कुभांर, गणेश चोंधे, वैभव घटकांबळे, शिवाजी गायकवाड, गणेश साठे, संतोष ताटकर, प्रमोद चव्हाण, रूपाली शेडगे,नवनाथ मोकाशी,सतीश बनसोडे यांच्या समवेत मोकादम वैजीनाथ गायकवाड, आण्णा ढावरे, अशोक खुडे,अशोक कांबळे, साईनाथ तेलंगी,दत्ता जाधव यांनी एकूण २७ विक्रेत्यावर दंडात्मक कारवाई करून ४७,७००/- रुपये शुल्क वसूल करून ८६ किलो प्लास्टिक जप्त केले.



