आरोग्य

समस्या जेष्ठांच्या, चिंतन व उपाय ; डॉ सचिन नागापूरकर

जागतिक जेष्ठ नागरिक दिनानिमित्त

आज जागतिक जेष्ठ नागरिक दिन आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात न चुकता येणारा कालावधी म्हणजे जेष्ठत्व, म्हातारपण…आजमितीस जगभरात झालेल्या वैद्यकीय विषयातील संशोधनामुळे सामान्य माणूसाचे आयुष्यमान खूप वाढले आहे. आज वयाच्या 85/90 वया पर्यंत सुद्धा निरोगी आयुष्य जगणारे लोकं आहेत.

साधारणपणे वयाच्या साठी नंतरचा काळ हा जेष्ठ नागरिक म्हणून संबोधला जातो. नोकरदार वर्ग या वयातच आपल्या नोकरीतून मुक्त होऊन रिटायरमेंट आयुष्य जगण्यास सुरुवात करतो. आयुष्यातील एक महत्वाचा टप्पाच असतो हा कालावधी. मुलं मोठी झालेली असतात, नोकरी कामे करत असतात, सून जावाई आलेले असतात. आपला संसार थोडा बाजूला ठेवून मुलगा/ मुलगी च्या संसारात लक्ष घालावे लागते. नातू..नात आलेले असतात. आजारपणही सुरू होण्याचा हाच कालावधी असतो. शरिरातील बदल जाणवू लागतात. महिलांमध्ये विशेषतः जास्त प्रमाणातील बदल जाणवू लागतात. इतके वर्ष केलेला संसार आता सून बाईचा ताबा आलेला असतो.

मधूमेह/ उच्चरक्तदाब,वजन वाढणे असे आजार होण्यास सुरुवात झालेली असते. जेष्ठत्व प्राप्त झालेली गोष्ट जाणवत असते. वयोमानानुसार शरिरातील कॅल्शियम..व्हिट्यामिन ड चे प्रमाण कमी होत असते त्यामुळे कंबर, पाठ, गुढघेदुखी सुरू झालेली असते. चालण्या फिरण्यावर मर्यादा येण्यास सुरुवात होते.

आजमितीस असंख्य जेष्ठ नागरिक हे कौटुंबिक जीवनातील वाद वैचारिक मतभेद मुळे एकटेच राहताना आढळतात. कोणी दोघे जेष्ठ नवरा बायकोच एकत्र राहतात. मुलगा/ सून/ मुलगी/ जावाई. फारशी दखल देत नाहीत तर काही जेष्ठ नागरिक वृद्धाश्रमात राहणे पसंद करतात.जेष्ठ नागरिकांना आज आपण सर्वानी एकत्र येऊन मिळून आधार देणे आवश्यक आहे. आपणही आज ना उद्या जेष्ठ वृद्ध होणार आहोत याचे भान ठेवले पाहीजे.

Img 20210821 wa0004

जेष्ठ नागरिकांमध्ये वैद्यकीय आजारांचे प्रमाण खूप असते.
डोळ्याचे आजार, हाडांचे आजार, कंबरदुखी, गुढघेदुखी,
उच्चरक्तदाब, मधूमेह, कर्करोग आज जेष्ठ नागरिकांना आपल्या आधाराची मानसिक धीर देण्याची गरज आहे.
त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी जीवनातील उमेद कायम ठेवण्यासाठी आधाराची गरज आहे.

जेष्ठ नागरिक संघटना सारख्या गोष्टींमधून आज बरेच जेष्ठ नागरिक आपले आयुष्य खुप छान उपक्रम आयोजित करून जगत आहेत. आपल्याला फक्त त्यांना मानसिक मदत करायची आहे. आपल्या घरातील असो, परिसरातील असो, नातेवाईक असो जे कोणी जेष्ठ नागरिक असतील त्यांची विचारपूस करायची आहे. त्यांना काही वैद्यकीय मदत लागत असेल तर ती उपलब्ध करून द्यायची आहे. जेष्ठांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत.

आजही काही जेष्ठ नागरिक हे तरूणांना लाजवतील इतक्या उमेदीने काम करतात. आज सर्वच क्षेत्रात जेष्ठ नागरिक आपल्या कामाची दखल घेतली जाईल अशी कामे करताना दिसून येतात चला तर मग आज जेष्ठ नागरिक दिनानिमित्त जेष्ठांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करूयात जेष्ठांच्या वैद्यकीय आजाराचे लवकरात लवकर निदान व उपचार करून त्यांना तरूण राहण्यास मदत करू यात.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये