पुणे शहर

ग्राहक (उपभोक्ता ) संरक्षण समितीच्या पुणे शहर अध्यक्षपदी  कैलास माझिरे यांची निवड ..

पुणे : pune city ग्राहक (उपभोक्ता ) संरक्षण समितीच्या पुणे शहर अध्यक्षपदी  कैलास माझिरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादा केदारे व महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विनीत साळवी तसेच महाराष्ट्र राज्य अध्यक्षा अनिता घोडगावकर यांनी यांनी ही नियुक्ती केली आहे.

ग्राहकांच्या हक्कासाठी व ग्राहकांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी ग्राहक (उपभोक्ता ) संरक्षण समिती काम करत असून संपूर्ण भारतात ही समिती कार्यरत आहे. सामजिक आवड असणारे व लोकांच्या हक्कासाठी लढणारे समाजसेवक यांनी समिती मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन निवड झाल्यानंतर पुणे शहर अध्यक्ष कैलास मझीरे यांनी समितीच्या वतीने केले आहे.

अनेक ठिकाणी ग्राहकांची फसवणूक होत असते, परंतु याबाबत न्याय कसा मागवा याबाबत ग्राहकांना जास्त कल्पना नसते त्यामुळे ग्राहकांच्या हक्कांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच फसवणूक झालेल्या ग्राहकांना न्याय देण्याचा सर्वोपतरी प्रयत्न समितीच्या माध्यमातून आपण करणार असल्याचे मझिरे यांनी सांगितले.

Img 20210818 wa0002

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये