पुणे शहर

शिक्षक दिनानिमित्त कर्वेनगरमधील शिक्षकांचा चेतन भालेकर यांच्याकडून सन्मान..

कर्वेनगर :  ५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून चेतन भालेकर मित्र परिवार व श्री विठ्ठल रुक्मिणी मित्र मंडळच्या वतीने कर्वेनगर परिसरातील शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

कर्वेनगर मधील रामचंद्र वालगुडे सर, प्रा.संभाजी चौघुले, श्रद्धा केंगार, सौ. निकुडे मॅडम, शिंदे सर, गेजगे सर, कांबळे मॅडम, रेवाड़कर सर यांचा चेतन भालेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी राजाभाऊ भालेकर, मंगेश जगताप, रोहित चव्हाण, विकास पायगुडे, ओंकार मते आदी उपस्थित होते.

चेतन भालेकर म्हणाले, देशासाठी सुसंस्कृत व सामर्थ्यवान पिढी घडवण्याचे काम शिक्षक करत असतात. गुरु आणि शिष्य यांचे एक वेगळे नाते आहे. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना घडवण्याचे मोठे काम शिक्षक करतात. एक प्रकारे देश घडवण्याचे काम शिक्षक करत असल्याने समाजात त्यांना महत्वाचं स्थान आहे. म्हणूनच शिक्षकांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षकांचा सन्मान करण्यात आला आहे.

Img 20210818 wa0002

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये