राष्ट्रवादी काँग्रेस कोथरूड मतदारसंघ अध्यक्षपदी हर्षवर्धन मानकर यांची निवड

कोथरूड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुणे शहराची कार्यकारणी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी जाहीर केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस कोथरूड मतदारसंघ अध्यक्षपदी हर्षवर्धन दीपक मानकर यांची निवड करण्यात आली आहे.कोथरूड मतदारसंघ अध्यक्ष असलेल्या स्वप्निल दुधाणे यांची शहर उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पुणे शहरातील आठ मतदारसंघाच्या अध्यक्ष, कार्याध्यक्ष, शहर उपाध्यक्ष, प्रदेश प्रतिनिधी आदी पदांच्या नियुक्ती आज पत्रकार परिषदेत जाहीर केल्या.
यावेळी बोलताना हर्षवर्धन मानकर म्हणाले, पक्षाने या पदाच्या निमीत्ताने माझ्यावर विश्वास दाखवून मोठी जबाबदारी सोपवली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत कोथरूड मतदारसंघा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी मी काम करणार आहे.




