पुणे शहर

सत्यमेव जयते फौंडेशनच्या वतीने महाड तालुक्यातील शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप

पुणे : सत्यमेव जयते फौंडेशनच्या वतीने महाड तालुक्यात कोतुर्डे गावातील पाच शाळांमधील १८० मुलामुलींना अभ्यासाकरीता दप्तरासहीत शालेय उपयोगी साहित्य देण्यात आले. फौंडेशनच्या संस्थापिक वैशाली शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम पार पडला. Distribution of educational materials in schools of Mahad taluka on behalf of Satyamev Jayate Foundation

किल्ले रायगड परिसरातील आदिवासी भागातील विद्यार्थी व त्यांचे शिक्षक यात सहभागी होते. कोविड प्रतिबंधक सर्व नियम पाळुन हा कार्यक्रम झाला. शैक्षणिक साहित्य मिळाल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता.

Img 20210910 wa0274

यावेळी अणुशक्ती विभाग स्वायत्त संस्था सभासद संघटनेचे माजी अध्यक्ष राम धुरी, सत्यमेव जयते फाऊंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शैलेश आशर, पर्यावरण विभागाचे अध्यक्ष सुनिल आहेर, क्रिडाप्रमुख कैलास माझिरे, पर्यावरण अध्यक्ष साहिल भोसले , टाटा मुलभूत संशोधन संस्थेच्या सभासद संघटनेचे अध्यक्ष संदेश बागवे, टाटा मुलभूत संशोधन संस्था पतपेढीच्या संचालक मंडळाचे प्रतिनिधी स्वप्नील मालवणकर आदी उपस्थीती होते .शिक्षक प्रतिनिधी तुकाराम माने यांनी शाळेतील सर्व शिक्षकांच्या वतीने सुत्र संचालन केले.

Img 20210818 wa0002

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये