कोथरुड

प्रभाग क्रमांक १० भुसारी कॉलनी मधील विकास कामांचे भीमराव तापकीर यांच्या हस्ते उद्घाटन..

कोथरुड : pune city, kothrud नगरसेविका अल्पना गणेश वरपे यांच्या पुणे महानगरपालिकेच्या विकासनिधीतून प्रभाग क्रमांक १० भुसारी कॉलनी, बावधन मध्ये करण्यात आलेल्या कामांची उद्घाटने व काही कामांचे भूमिपूजन आमदार भिमराव तापकीर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी  प्रभागात विविध ठिकाणी सीसीटीव्ही बसविणे व भारती नगर येथील ज्येष्ठ नागरिकांकरिता विरंगुळा शेड उभारण्याच्या कामाचे भूमीपुजन व महात्मा सोसायटी डीपी रोड येथील ओपन जीमचे लोकार्पण तसेच भारतीनगर येथील कै.शरदराव यशवंतराव शिंदे सरकार चौकाच्या नामफलकाचे उद्घाटन तापकीर यांच्या हस्ते करण्यात आले.

Img 20211028 wa0192 1

आमदार भीमराव तापकीर म्हणाले, विविध विकास कामांबरोबरच नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे हे देखील लोकप्रतीनीधीचे कर्तव्यच आहे. प्रभागात कोरोना काळात नगरसेवकांनी केलेल्या कामांचे कौतुक त्यांनी यावेळी केले.

यावेळी बोलताना नगरसेविका अल्पना वरपे म्हणाल्या की, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच महिलांवर होणार्‍या अत्याचाराच्या घटना व चोरीच्या घटनांना आळा बसण्याकरता सीसीटीव्ही जास्तीत जास्त ठिकाणी बसविणे गरजेचे आहे व त्यासाठी मी प्रयत्नशील आहे.

Screenshot 2021 10 26 15 21 45 02

यावेळी महाराष्ट्र राज्य वाहतुक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे, नगरसेवक किरण दगडे पाटील, दिलीप वेडेपाटील, नगरसेविका डाॅ. श्रद्धा प्रभुणे-पाठक, सागर कदम, अॅड.गणेश वरपे, प्रभाग अध्यक्ष सागर कडू, कैलास मोहोळ, राजेश कुलकर्णी, अक्षय ढाकणे, गणेश कोकाटे, प्रदिप जोरी, सुरेंद्र कंधारे, भरत मराठे, राजेश मनगिरे, गणेश लोखंडे, राहुल जाधव, रूपेश भोसले, राजीव निगडीकर, अभिजीत धुमाळ, अभिजीत ठाकूर, विनायक वरपे, प्रणव उभे, संतोष महाजन, सिद्धेश कवडे, कैलास माझिरे, अजित शिगवण, विजय राठोड, अमोल शिर्के, रोहित जाधव, ओंकार शिंदे आदि पदाधिकारी तसेच गायत्रीताई काळभोर,विद्याताई टेमकर,सुप्रियाताई माझिरे,अमरजाताई पटवर्धन,सुहासिनीताई शिराढोणकर आदि भाजपा महिला पदाधिकारी तसेच राजाभाऊ जोरी, विनायक कडू, अमित सातपुते, साहेबराव मोरे, राजेंद्र पवार,जयरामजी दिघे, अश्विन भूमकर, राहुल रोकडे, आदि मान्यवर व अखिल भारतीनगर मंडळाचे कार्यकर्ते व भारती नगरमधील नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये