पुणे शहर

पुणे महापालिकेने शहरातील खेळाडूंचा शिष्यवृत्ती देऊन सन्मान करावा ; दिपाली धुमाळ

पुणे : pune city, Kothrud पुणे महानगरपालिकेने खेळाडूंना सन २०२०-२१ व २१-२२ या वर्षाची क्रीडा शिष्यवृत्ती देणे आवश्यक असुन खेळाडूंच्या पुर्वीच्या ३ वर्षांच्या काळात केलेल्या कामगिरीचा विचार करून शिष्यवृत्ती दिली जावी. कोरोना काळात फक्त ८ महिने स्पर्धा झाल्या नाहीत, म्हणून क्रीडा शिष्यवृत्ती न देण्याचा निर्णय घेणे संयुक्तिक होणार नाही. तसेच सर्व खेळाडूंना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी क्रिडा धोरणातील निवडपत्राची अट शिथील करावी व पुणे महापालिका हद्दीतील खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती देऊन त्यांचा सन्मान दरवर्षी प्रमाणे करावा अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केली आहे.

पुणे महानगरपालिका दरवर्षी पुण्यातील गुणवंत खेळाडूंचा सत्कार व क्रीडा शिष्यवृत्ती देऊन सन्मान करत
असते. परंतु पालिकेने सन २०२०-२१ चे क्रीडा शिष्यवृत्ती वाटप केले नाही. वास्तविक प्रशासनाने या विषयी जाहिरात देऊन खेळाडूंकडून अर्ज मागवणे आवश्यक होते, मात्र तसे झाले नाही. मार्च २०२० नंतर कोरोनाचे संकट आल्यानंतर पुढचे काही महिने म्हणजे साधारणपणे डिसेंबर २०२० पर्यंत बऱ्याच ठिकाणी स्पर्धा झाल्या नाहीत.

Img 20211028 wa0192 1

परंतु जानेवारी २०२१ नंतर देशविदेशात बऱ्याच ठिकाणी स्पर्धा चालू झाल्या आहेत. खेळाडु कोरोनाचे संकट असताना देखील कोरोना विषयक प्रतिबंधात्मक उपाय व नियम या अनुषंगाने विविध स्पर्धेत भाग घेत आहेत. अनेक खेळाडु राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये संबंधीत क्रिडा असोसिएशन नियमानुसार त्यांनी केलेल्या आजपर्यंतच्या खेळातील कामगिरीनुसार मिळालेल्या मानांकनानुसार निवड श्रेणीमधुन सहभागी होत असतात.  अशा खेळाडुंना निवड पत्राची आवश्यकता नसते. परंतु मनपा क्रिडा धोरणात निवडपत्र असेल तरच शिष्यवृत्ती देणेबाबतचा नियम आहे. यामुळे अनेक खेळाडु या शिष्यवृत्तीपासुन वंचित राहतात, याबाबत पुणे मनपाने योग्य ती खबरदारी घेवून कोणत्याही खेळाडुवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी. अशी मागणी धुमाळ यांनी महापालिका आयुक्तांकडे दिलेल्या पत्रात केली आहे.

Screenshot 2021 10 26 15 21 45 02

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये