कोथरुड

जयभवानीनगर येथील महापालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत..

कोथरुड : दिड वर्षांनंतर शाळा पुन्हा सुरु झाल्यानंतर कोथरुड येथील जयभवानीनगर मधील पुणे महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले.

यावेळी संतोष डोख यांच्या वतीने चॅाकलेट व शुभेच्छापत्रे देऊन मुलांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. शाळेने कोरोना प्रतिबंधात्मक काळजी व्यवस्थितरीत्या घ्यावी अशी विनंती शाळा व्यवस्थापनाला त्यांनी केली.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक वर्ग, कर्मचारी, पालक उपस्थित होते. शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचा आनंद पाहण्यासारखा होता. प्रसन्न व उत्साही वातावरणात मुलांनी यावेळी शाळेत प्रवेश केला.

Img 20211129 wa0128

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये