महाराष्ट्र
कोरोनाबाधितांचा आकडा दुप्पट; निर्बंध कठोर करण्याचा आरोग्यमंत्र्यांचा इशारा

मुंबई : मागील सात दिवसात कोरोनाबाधितांचा आकडा दुप्पट झाले आहे. मुंबईत रोज 51 हजार चाचण्या केल्या जात आहेत. यात 2200 पॉझिटिव्ह आले तर 4 टक्के पॉझिटीव्हीटी रेट मुंबईचा जात आहे. असे असेल तर चांगले नाही, काळजी घेण्याची गरज आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
नियम पाळावे लागतील अन्यथा निर्बंधात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. दिल्लीने कडक निर्बंध लावले आहेत. आपल्याकडे या गोष्टी सहजासहजी घेतल्या तर त्याची किंमत संख्यात्मक वाढ होऊन चुकवावी लागेल. निर्बंधाबाबतचा निर्णय मुख्यमंत्री, टास्क फोर्स एकत्रित घेतील असे देखील टोपे यावेळी म्हणाले. आता 11 हजार 092 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.




