महाराष्ट्र

राधानगरी धरणाचा उघडलेला दरवाजा बंदच होत नसल्याने कोल्हापूरमध्ये अलर्ट पहा व्हिडिओसह बातमी…

पुणे : तांत्रिक कामासाठी उघडण्यात आलेला राधानगरी धरणाचा दरवाजा पुन्हा बंद करताना अडकल्यामुळे व बंद होत नसल्यामुळे कोल्हापुरात विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. हा दरवाजा जवळपास 18 फुटाने उघडला गेला आहे. त्यामुळे पंचगंगा, भोगावती नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

https://fb.watch/abNu5ZWaJ7/

राधानगरी धरणाच्या दरवाजाचे तांत्रिक काम सुरू असताना दरवाजा उघडण्यात आला होता. मात्र, बंद करताना तो अडकल्यामुळे धरणातून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढला आहे. धरणाचा अडकलेला दरवाजा बंद करण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. जलसंपदा विभागातील तांत्रिक विभागातील अभियंते आणि कर्मचाऱ्यांचे पथक तातडीने राधानगरी धरणाकडे रवाना झाले आहे. पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदी पात्रात वाढ झाली असल्याने नदी काठावरील गावातील नागरिकांनी नदीवर जनावर, धुणे धुवायला जाणे टाळावे अशा असे आवाहन करण्यात आले आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्याने राधानगरी, करवीर, कोल्हापूर शहर, हातकणंगले, इचलकरंजी, शिरोळ तालुक्यातून वाहणाऱ्या पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली आहे. कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जात आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्याने कोल्हापूर महानगरपालिकेच्या थेट पाइपलाइन कामातही अडचणी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Screenshot 20211227 1402344603556305344739789

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये